शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

Solapur Politics; वडिलांच्या सात-बाऱ्यावर ऐतखाऊ पोरांनं दुसऱ्यांना बांडगूळ म्हणू नये; माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:05 IST

वांगं निवडतानासुद्धा किडकं वांगं आपण बाजूला काढतो. त्याप्रमाणे आता तालुक्याचं हे किडकं वांगं बाजूला करण्याची वेळ आली आहे. सगळी बांडगुळं मी सरळ करतो म्हणणा-या मालकांना मी हक्कानं एवढेच सांगेन, वडिलांच्या सात-बा-यावर ऐतखाऊ पोरानं दुस-याला बांडगूळ म्हणणे बरोबर नाही. त्याची किंमत काय आहे, हे राजन पाटील तुमच्या पक्षाला माझ्या प्रचारातून मोजायला लावीन, असा इशारा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला.

ठळक मुद्देआदर्शाचा मोरच राष्ट्राच्या चौकीदाराला चोर म्हणतोय - लक्ष्मणराव ढोबळेरमेश कदम तेच पुन्हा मोहोळ तालुक्याचे आमदार होतील - लक्ष्मणराव ढोबळे

मोहोळ : वांगं निवडतानासुद्धा किडकं वांगं आपण बाजूला काढतो. त्याप्रमाणे आता तालुक्याचं हे किडकं वांगं बाजूला करण्याची वेळ आली आहे. सगळी बांडगुळं मी सरळ करतो म्हणणा-या मालकांना मी हक्कानं एवढेच सांगेन, वडिलांच्या सात-बा-यावर ऐतखाऊ पोरानं दुस-याला बांडगूळ म्हणणे बरोबर नाही. त्याची किंमत काय आहे, हे राजन पाटील तुमच्या पक्षाला माझ्या प्रचारातून मोजायला लावीन, असा इशारा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला.

गोटेवाडी (ता. मोहोळ) येथे भीमा-लोकशक्ती परिवारातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सी. एम. चषकाचा मानकरी समाधान वाघमोडे-पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी सभापती यशवंत नरोटे, झेडपी सदस्य तानाजी खताळ, भीमाचे माजी संचालक सुरेश शिवपुजे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, सर्जेराव चवरे, फंटू गोफणे, वाघोली मिलचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र खांडेकर, सुनील पाटील, शिवाजी पासले, मुकुंद आवताडे, सागर लेंगरे, भारत घोडके, दत्ता शेळके आदी उपस्थित होते.

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे पुढे म्हणाले, रमेश कदम आमदार म्हणून का चालले, तर ते मुंबईला. इथे मीच डमी आमदार म्हणून काम करतो, ही त्यांची कामाची स्टाईल आहे. आता बनसोडेंना आमंत्रण दिले आहे. त्यांचा स्टॉक एक्स्चेंजमध्ये ठेवून पुन्हा हेच राज्यकर्ते होणार आणि तालुक्याच्या राजकारणात मिरवणार. देशासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून, जीवाची बाजी लावून सीमेवर लढणाºया सैनिकांच्या काळजात शंका निर्माण करण्याचं काम करणाºयांनी बोलताना भान ठेवावं,  आदर्शाचा मोरच राष्ट्राच्या चौकीदाराला चोर म्हणतोय, असा खरपूस समाचार घेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली  

रमेश कदमच पुन्हा आमदार होतीलच्तालुक्यात पंचवीस वर्षे सेवा केली; मात्र शिस्त लावायला जमली नाही. रमेश कदम यांचा महिनाभरात जामीन होईल. तेच पुन्हा मोहोळ तालुक्याचे आमदार होतील. कारण मोहोळ तालुक्याला शिस्त लावण्याची धमक फक्त रमेश कदमांकडेच आहे, असे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले.

प्रकाशराव गड्यासारखं बोलू नकाकारखान्यावर हंगामी काम करणा-या रिफीलची कांडी संपलेल्या प्रकाश चवरेंनी ‘मला जरा संसाराकडे लक्ष द्या, लबाड बोलू नका, असा सल्ला दिला होता. याबाबत बोलताना ढोबळे म्हणाले, प्रकाशराव अगोदर गावावर राहायला या. गावातलं घर पडलंय का ते जागेवर आहे का बघा. तुम्ही आता सोलापूरकर झालात. भाड्यानं लावलेल्या गड्यासारखं बोलू नका, असा सल्ला दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूकRamesh Kadamरमेश कदम