शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

solapur politics : सांगोला विधानसभेसाठी ९३ व्या वर्षीही गणपतरावांची उमेदवारी फिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 15:42 IST

शहाजीबापूही सातव्यांदा निवडणुकीसाठी तयार

ठळक मुद्देवैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागणे-पाटील याही निवडणूक लढविण्याच्या इराद्याने तयारीला लागल्यामाढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपकआबा साळुंखे इच्छुकसांगोला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढविणार

अरुण लिगाडे सांगोला : सांगोल्यातून विधानसभेसाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) आघाडीकडून आ. गणपतराव देशमुख यांची उमेदवारी ९३ व्या वर्षीही फिक्स मानली जाते. तसेच माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे-पाटील यांचे भवितव्य भाजपा, शिवसेना यांच्यातील युतीवरच अवलंबून आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर सांगोला विधानसभेचे चित्र वेगळेच राहणार आहे. निवडणुकीसाठी राजश्री नागणे-पाटील, कमरुद्दीन खतीब, भारत गवळी, मधुकर बनसोडे हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपकआबा साळुंखे इच्छुक आहेत. तशी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील सातव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. सध्या ते कोणत्याच पक्षात नसले तरी त्यांची भूमिका वेट अँड वॉचची आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख भाजपाकडून सलग दुसºयांदा इच्छुक असून, त्यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.

वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागणे-पाटील याही निवडणूक लढविण्याच्या इराद्याने तयारीला लागल्या आहेत. भाजपाकडून उमेदवारी नाही मिळाली तर शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे़ राष्ट्रीय समाज पक्षही सांगोला विधानसभेची जागा लढवणार असल्याचे सूतोवाच पक्षातील नेत्यांनी केले असून, पक्षाकडून सध्या तरी सोमा मोटे यांचे नाव चर्चेत आहे. 

शिवसेना-भाजपा यांच्यात युती झालीच नाही तर शिवसेनेकडून कमरुद्दीन खतीब, भारत गवळी, मधुकर बनसोडे हेही इच्छुक असल्याचे समजते. मात्र आजपर्यंतच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करता खरी लढत विद्यमान आ. गणपतराव देशमुख, माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील या दोघांत झाली आहे. 

माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांचा १९९५ चा विजय वगळता आ. गणपतराव देशमुख यांनी त्यांचा तब्बल सहा वेळा पराभव केला आहे. तर आ. गणपतराव देशमुख यांनी ९५ चा पराभव वगळता ११ वेळा सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ते पुन्हा १२ व्या वेळेस निवडणूक लढविण्यास तयारीला लागले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखPoliticsराजकारण