शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, सहा़ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सवाणे यांना पोलीस पदक जाहीर, सोलापूर दलातील पोलीसांची मान उंचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 14:47 IST

राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत

ठळक मुद्देसोलापूर पोलीसांची मान उंचावलीअधिक चांगले काम करण्यासाठी मिळाली प्रेरणा : ज्ञानेश्वर चव्हाणआजपर्यंत बजाविलेल्या प्रामाणिक सेवेचा गौरव : दिलीप सवाणे

आप्पासाहेब पाटीलसोलापूर  दि २५ : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यात प्रामुख्याने मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगांव येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण यांच्यासह सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार बब्रुवान सवाने यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे़ ज्ञानेश्वर चव्हाण हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगांव येथील रहिवासी आहेत. चव्हाण हे १९९३ च्या उपविभागीय पोलीस अधिकारी बॅचचे अधिकारी आहेत़ त्यानंतर २००१ साली प्रोमोशनवरून ते आयपीएस पदावर पदोन्नतीने पदभार घेतला़ त्यांनी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलात चांगल्यारितीने आपली सेवा बजावली़ त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण आहे. आईवडील अशिक्षित असतानाही त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. या पदकाबाबत आनंद झाला असून, अधिक चांगले काम करण्यासाठी यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले व मुळचे पाटकूल (ता़ मोहोळ) येथील रहिवाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सवाणे यांनाही पोलीस दलात मानाचे पोलीस पदक जाहीर झाले आहे़ ३ जुलै १९८३ साली पोलीस दलात रूजू झालेले सवाणे यांनी आजपर्यंत विविध पदावर काम केले आहे़ त्यांनी आजपर्यंत जेलरोड पोलीस ठाणे, अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे शाखा, विशेष शाखा, सोलापूर ग्रामीण आदी ठिकाणी व विविध पदावर आपली सेवा चोख बजावली़ सवाने यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत़ त्यांना सुनिल नावाचा एक भाऊ आहे़ मागील ३५ वर्षापासून पोलीस दलात चव्हाण हे कार्यरत आहेत़ त्यांना आजपर्यंत ३६८ रिवार्ड मिळालेले आहेत़ आजपर्यंत बजावलेल्या सेवेबद्दल सवाणे यांनी आनंद व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले़ या यशाबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोर्णिमा चौगुले, अपर्णा गीते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी अभिनंदन केले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस