शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: नाशिक, अहमदनगरचा कांदा २४०० रुपयांनी शासन घेणार; सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या २७०० रुपये दर

By रवींद्र देशमुख | Updated: August 22, 2023 17:47 IST

Solapur Onion Price:

- रवींद्र देशमुख सोलापूर : नाशिक, अहमदनगरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने नाफेड खरेदी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने शासन खरेदी करणार आहे तर दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या सरासरी १५०० ते २७०० रुपयांचा दर मिळत आहे.

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकरी व व्यापारी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी लिलाव बंद ठेवण्यात आल्याने केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतलेला आहे. सध्या निर्यातीसाठी कंटेनर मध्ये भरलेला कांदा नाफेडच्या दरानुसार केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी नाशिक, अहमदनगर या ठिकाणी नाफेड खरेदी केंद्र सुरू करून त्या मार्फत शासन प्रतिक्विंटल २४०० रुपये दराने  कांदा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील प्रमुख कांदा मार्केट म्हणून नावारूपास आलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. एकीकडे राज्यात लिलाव बंद असताना गेल्या दोन दिवसापासून सोलापूर बाजार समितीत सुरळीतपणे सुरू आहे. सोमवारी ११० ट्रक कांद्याचे आवक होती मंगळवारी त्यात वाढ होऊन १५० ट्रक आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय प्रतिक्विंटल १५०० ते २७००  सरासरी दर मिळत आहे चांगल्या मालाला ३५०० रुपयाचाही दर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोलापूर बाजार समितीतील कांदा मार्केट सुरळीतपणे सुरू असल्याचे व्यापारी संचालक केदार उंबरजे यांनी सांगितले. 

बैठकीत लिलाव सुरळीत ठेवण्याचा निर्णय मंगळवारी कांदा व्यापारी, अडत व्यापारी, हमाल तोलार  यांची बैठक झाली. सोलापूर मार्केट मध्ये येणारा कांदा थेट एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे निर्यात शुल्कवाढीचा फटका आपल्याकडील शेतकऱ्यांना बसणार नाही. त्यामुळे लिलाव सुरळीत ठेवून शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्रSolapurसोलापूर