शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दांपत्याला मारहाण करून दागिने लुटले, पळताना एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 24, 2023 19:18 IST

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

सोलापूर : झोपलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून पाच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत  काठीने जबर मारहाण केली. गळ्यातील दागिने व कर्णफुले घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मात्र या घटनेदरम्यान वस्तीवरील लोक जागे झाले आणि त्यांच्यापैकी एका चोरट्याला जमलेल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. 

रविवार, २३ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास लऊळ (ता.माढा) येथील मांदेवस्ती येथे ही घटना घडली.याबाबत शशीकला शंकर मांदे (वय ६०) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दादा कांगऱ्या शिंदे (वय ५५,रा.उजनी मा,ता.माढा) असे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलेल्या चाेरट्याचे नाव आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार शशीकला मांदे आणि त्यांचे पती शंकर मांदे रविवारी रात्री घरात झोपले होते. रात्री ११: ३० ते ११: ४० वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे घरात शिरले. दोघांनी चाकूचा धाक दाखवत  मारहाण करण्यास सुरूवात केली. वृध्द महिलेच्या अंगावर बसून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व कर्णफुलेसह ७८ हजार ५०० रूपयांचा ऐवज काढून घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

पिता-पूत्र आले धाऊन वीज आली आणि शेतात लाईट आली म्हणून दारं धरायला गेलेले पिता-पुत्र वृद्ध दांपत्याचा आरडाओरडा ऐकून वस्तीवर धावून आले. कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यांनी धूम ठोकली. त्यांच्यापैकी चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र एकजण समोर असणा-या मेकेला धडकून खाली पडला. लागलीच त्या दोघांनी त्याला पकडले आणि त्याला बांधून ठेवले. 

ग्रामसुरक्षा दल सतर्क  त्यानंतर त्या पिता-पुत्राने पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांना फोनद्वारे माहिती दिली.   लोकरे यांनी ही घटना कुर्डूवाडी पोलिसांना कळवून ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे लोकांनाही सतर्क केले. अवघ्या काही वेळातच गस्तीवर असणारे पोलिस  घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पकडलेल्या चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी