आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : मिळकतकराच्या थकबाकीपोटी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीतील दहा जणांच्या निवासस्थानाचे नळकनेक्शन विशेष वसुली पथकाने तोडले. मनपातर्फे विशेष वसुली मोहिमेंतर्गत पथकाने गुरुवारी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीत वसुली मोहीम घेण्यात आली. करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे नळ तोडण्यात आले. थकबाकीदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. किसन माने (थकबाकी: ३७ हजार), व्हाबय्या कुमार (४६ हजार), सिंधू नरोटे (५८ हजार), मारुती आयगोळे (४२ हजार), शरण्णप्पा काळे (६३ हजार), येदू उडाणशिवे (३५ हजार), शिवम्मा शिंदे (२८ हजार), भीमराव चाबुकस्वार (५१ हजार), रायगोंडा हदगल (८0 हजार). बुधवारपेठेतील लक्ष्मण महाराज प्रशालेचे मुख्याध्यापक तुळजाराम शेट्टी यांचे कार्यालय सील करण्यात आले. ६ लाख २८ हजार इतकी थकबाकी आहे. गुरुवारी वसुली पथकांनी शहर विभागात २२ लाख ३ हजार तर हद्दवाढ भागात २१ लाख २७ हजार अशी ४३ लाख ३१ हजारांची करवसुली केली. शहरात १0 तर हद्दवाढ भागात ८ नळ तोडण्यात आले. १ ते २२ फेब्रुवारी या काळात ५ कोटी २५ लाख ७२ हजार करवसुली झाली तर ६७ नळ तोडण्यात आले आणि १२ ठिकाणी मिळकतीला सील ठोकण्यात आले.
थकबाकीअभावी सोलापूर महापालिका कर्मचारी वसाहतीतील नळ तोडले, बुधवार पेठेतील शाळेला घातले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:43 IST
मिळकतकराच्या थकबाकीपोटी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीतील दहा जणांच्या निवासस्थानाचे नळकनेक्शन विशेष वसुली पथकाने तोडले.
थकबाकीअभावी सोलापूर महापालिका कर्मचारी वसाहतीतील नळ तोडले, बुधवार पेठेतील शाळेला घातले सील
ठळक मुद्देमनपातर्फे विशेष वसुली मोहिमेंतर्गत पथकाने गुरुवारी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीत वसुली मोहीम घेण्यात आली.करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे नळ तोडण्यात आले१ ते २२ फेब्रुवारी या काळात ५ कोटी २५ लाख ७२ हजार करवसुली झाली तर ६७ नळ तोडण्यात आले आणि १२ ठिकाणी मिळकतीला सील ठोकण्यात आले.