शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका स्थायी सभापतीसाठी रस्सीखेच, इच्छुकांचे लॉबिंग, दोन मंत्र्यांमध्ये कशी होणार वाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:57 IST

मनपा स्थायी सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार  देशमुख यांच्या गटातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.

ठळक मुद्देपहिल्या वेळेस पालकमंत्री गटाच्या संजय कोळी यांची वर्णी लागल्याने यावेळेस सहकारमंत्र्यांच्या गटाच्या सदस्याला संधी मिळावी या मागणीला जोर धरला आहेभाजपमध्ये सत्तांतर झाल्यावर पदाधिकारी निवडीवेळी रस्सीखेच झाली होतीसहकारमंत्र्यांनी या निवडीत लक्ष घातले तर पदांच्या वाटणीवरून पुन्हा चुरस निर्माण होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : मनपा स्थायी सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार  देशमुख यांच्या गटातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. पहिल्या वेळेस पालकमंत्री गटाच्या संजय कोळी यांची वर्णी लागल्याने यावेळेस सहकारमंत्र्यांच्या गटाच्या सदस्याला संधी मिळावी या मागणीला जोर धरला आहे. भाजपमध्ये सत्तांतर झाल्यावर पदाधिकारी निवडीवेळी रस्सीखेच झाली होती. पालकमंत्री गटाचे ३५ तर सहकारमंत्री गटाचे १६ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी  स्थायी व सभागृहनेतेपद आपल्याच गटातील सदस्यांना दिले. या वादातून वर्षभर पदाधिकाºयांना कामच करता आले नाही. आता स्थायी सभापती संजय कोळी यांची मार्चमध्ये मुदत संपत आहे. तर स्थायी सभेतून भाजपचे चार सदस्य निवृत्त झाले आहेत. फेब्रुवारी सभेत  या चार सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची वर्णी लागणार आहे. आपल्या गटाचे जितके सदस्य बाहेर गेले तितकेच पुन्हा नव्याने आत येतील असे पालकमंत्री देशमुख यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद उफाळला तर मतदानाद्वारे जरी निवड झाली तरी आपल्याच गटाला पद मिळावे अशी सावध भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे नवी चार नावे कोणाची असतील यावरूनही सभापती पदाची दिशा ठरणार आहे. इकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला यावेळेला तरी स्थायी सभापतीपदाची संधी मिळावी असे वाटत आहे. त्यादृष्टीने सदस्यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. नागेश वल्याळ यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांनी सभागृहनेता पदावर पसंती दाखविली आहे. त्यामुळे त्यांना सभागृहनेता सुरेश पाटील यांच्या निवृत्तीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नव्याने येणाºयांमध्ये संगीता जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी या निवडीत लक्ष घातले तर पदांच्या वाटणीवरून पुन्हा चुरस निर्माण होणार आहे. इकडे श्रीनिवास रिकमल्ले, शिवानंद पाटील यांनीही फिल्डिंग लावली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका