शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सोलापूर मनपा निवडणूक खर्चाचा ताळमेळ लागेना, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे, लाखो रूपयांवर झाली उधळपट्टी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 12:28 IST

मनपा निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा हिशोब निवडणूक कार्यालयास अद्याप लागेना झाला आहे. माहितीच्या अधिकारात फक्त ६७ लाखांच्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकारात फक्त ६७ लाखांच्या खर्चाची माहिती देण्यात आलीमनपाच्या अंदाजपत्रकात निवडणूक खर्चासाठी ४ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली होतीसीसी कॅमेºयाचा खर्च मोठामनपाचे सभागृह व इतर अनेक इमारती असताना नॉर्थकोट हायस्कूल भाड्याने घेऊन निवडणूक कार्यालय थाटण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : मनपा निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा हिशोब निवडणूक कार्यालयास अद्याप लागेना झाला आहे. माहितीच्या अधिकारात फक्त ६७ लाखांच्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. संभाजी आरमारचे शिवाजी वाघमोडे यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती. मनपा निवडणूक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक एस. आय. गुडदोर यांनी याबाबत लेखी माहिती दिली आहे. मनपाच्या अंदाजपत्रकात निवडणूक खर्चासाठी ४ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. मतदार जागृती अभियान, प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या छपाई, मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील कर्मचाºयांचे मानधन, रामवाडी गोदामावरील मतपेटी व्यवस्था, मतमोजणी प्रक्रिया अशा प्रकारे खर्च झालेला आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागातून खर्च झाला असून, अद्याप अदा झालेल्या बिलाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तरात म्हटले आहे. अंदाजे २ कोटी ६० लाखांचा खर्च झाल्याचे नमूद केले असून, अद्याप दोन कोटी रकमेचा हिशोब लागत नाही. निवडणूक उमेदवाराला दररोजचा खर्च वेळेत सादर करण्याचे बंधन घालून हिशोब सादर न करणाºयांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. पण इथे मनपाच्या हिशोबाचा अद्याप पत्ता नाही. नागरिकांच्या करातून झालेल्या पैशाच्या उधळपट्टीचा निवडणूक आयोग हिशोब का घेत नाही, असा सवाल संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी केला आहे.  -------------------सीसी कॅमेºयाचा खर्च मोठा- असा झाला निवडणूक कामाचा खर्च. शहरात ठिकठिकाणी सीसी कॅमेरे व टीव्ही बसविणे, अर्पण सोल्युशन: ८ लाख ६४ हजार, मतदार यादी छपाई, भक्ती कॉम्प्युटर्स: ४२ हजार १९१ व ६५ हजार ९९३, दक्षता पथकासाठी वाहने, प्रकाश टुरीझम: ५ लाख ६३ हजार ८८0, योगायोग ट्रॅव्हल्स: १0 लाख २0 हजार २४0, हुतात्मा स्मृती मंदिर भाडे: १२ लाख ५३ हजार ७00 रु., निवडणूक चित्रीकरण, आराध्या इन्फ्रास्ट्रक्चर: १२ लाख ३९ हजार ४0, मतदान केंद्रावर लायटिंगची कामे, ५१ हजार ४३२ रु. असा फक्त ६७ लाख ३ हजार ४७६ रुपयांच्या खर्चाचा हिशोब आतापर्यंत पूर्ण झाला आहे. ------------अशी झाली उधळपट्टी- मनपाचे सभागृह व इतर अनेक इमारती असताना नॉर्थकोट हायस्कूल भाड्याने घेऊन निवडणूक कार्यालय थाटण्यात आले. शाळेच्या परिसरात धूळ असल्याने दररोज टँकरने पाणी मारणे व मतदार जागृती आवाहनाचे फलक उभारण्यासाठी एक लाख खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर मंडप, सीसी कॅमेरे, व्हिडीओ चित्रीकरण, वाहने यांचा खर्च मोठा दाखविण्यात आला आहे. पण निवडणूक कार्यालय, रामवाडी गोदामाचे भाडे, राज्य परिवहन व मनपा परिवहनला अदा करण्यात आलेली बिले, निवडणूक कामासाठी वापरण्यात आलेल्या कर्मचाºयांचे मानधन किती अदा झाले याची माहिती अद्याप संकलित झालेली नाही हे विशेष.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका