शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेतील स्थापत्यच्या आकडेवारीत घोळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:23 IST

नगरसचिवांना निलंबित करण्याची स्थापत्य समितीची आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे शिफारस

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या स्थापत्य समितीची बैठक पार पडलीनगरसचिव यांना निलंबित करण्याची शिफारसअजेंड्यावर आलेल्या विषयांमध्ये गंभीर चुका

सोलापूर : स्थापत्य समितीच्या बैठकीसाठी काढण्यात आलेल्या अजेंड्यामध्ये झालेल्या गंभीर चुकांना जबाबदार धरून नगरसचिव यांना निलंबित करण्याची शिफारस आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे करण्यात आली आहे. स्थापत्य समितीच्या गतवर्षीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीची बैठक गुरुवारी सभापती गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अजेंड्यावर एकूण ४२ पूर्वगणनपत्रक विषय मंजुरीसाठी आले होते. बैठकीत आणखी १३ विषय तातडीने दाखल करण्यात आले. एकूण ५५ विषयांवर चर्चा होऊन एकमताने मंजुरी देण्यात आली.

या बैठकीच्या अजेंड्यावर आलेल्या विषयांमध्ये मोठ्या आणि गंभीर चुका आढळून आल्या. अनेक विषयांमध्ये टायपिंगच्या चुका निघाल्या. विषय क्रमांक ४0 आणि ४१ यामध्ये ६0 ते ६५ फायलींचे रेकॉर्ड जतन करण्यासाठी ४0 लाखांचे पूर्वगणनपत्रक स्थापत्य समितीसमोर आले होते. वास्तविक पाहता नगर अभियंता कार्यालयाकडे ६0 ते ६५ हजार फायली आहेत. असे असताना अजेंड्यावर केवळ ६0 ते ६५ फायली असा उल्लेख करण्यात आला.

विषय क्रमांक ४0 यामध्ये एस्टिमेट २४ लाख ५७ हजार असे असताना अजेंड्यावर १४ लाख ४0 हजार ३१२ दाखविण्यात आला आहे. यामध्ये १0 लाखांची तफावत करण्यात आली. तसेच विषय क्रमांक ४१ यामध्ये एस्टिमेट १७ लाख ४० हजार ३१२ रुपये असे असताना अजेंड्यावर मात्र ही रक्कम २४ लाख ५७ हजार अशी दाखविण्यात आली आहे. याचबरोबर अजेंड्यावरील विषय क्रमांक ६६ आणि ६७ यामध्ये चुकीचे छापण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेतून हे विषय होणार असून अजेंड्यावर मात्र भांडवली निधीतून असा उल्लेख करण्यात आला आहे.

महापालिकेच्या कामात अशा प्रकारची हलगर्जी योग्य नाही. प्रशासनावर अंकुश रहावा म्हणून स्थापत्य समितीने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा चुका होऊ नये व नगरसचिव कार्यालयाने आपले काम अचूक करावे यासाठी आपण स्थापत्य समितीच्या वतीने संबंधित नगरसचिवाला निलंबित करण्याची शिफारस केली आहे. -गुरुशांत धुत्तरगावकर, सभापती, स्थापत्य समिती. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका