शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट ; भांडवली कामांचे टेंडर थांबविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:10 IST

शहरातील विकासकामे रखडणार, नगरसेवकांची नाराजी

ठळक मुद्देरस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, पाणी पुरवठ्याच्या कामाचा समावेश सध्या मिळकतकराची बिले वाटण्याचे काम सुरूनगरसेवकांनी भांडवली निधीची अनेक कामे सुचविली ?

सोलापूर : नगरसेवकांच्या भांडवली कामांचे टेंडर थांबविण्यात यावेत, असे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मुख्य लेखापाल विभागाला दिले आहेत. 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. नगरसेवकांनी भांडवली निधीची अनेक कामे सुचविली आहेत. यात मंजूर झालेल्या कामांचे टेंडर काढण्यात आले, पण त्याला ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या कामांचे रिटेंडर करावे का, असा प्रस्ताव मुख्य लेखापाल कार्यालयाने आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मुख्य लेखापाल धनवे, पवार यांची बैठक घेतली. भांडवली कामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसे उपलब्ध नसतील तर रिटेंडर करण्यासाठी यंत्रणा कामाला लावणयात काय अर्थ आहे. नवीन कामे व रिटेंडर प्रस्ताव महापालिकेच्या तिजोरीत पैसे येईपर्यंत स्थगित ठेवावेत, अशा सूचना आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिल्या. 

सध्या मिळकतकराची बिले वाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे करभरणा अद्याप म्हणावा तसा होत नाही. बांधकाम परवाना व इतर विभागाकडून आलेल्या पैशातून महापालिकेचा इतर खर्च भागविला जात आहे. याशिवाय ठेकेदारांची जुनी देणी द्यायची आहेत. अशा परिस्थितीत भांडवली कामांसाठी्र कोठून पैसा आणणार, असा प्रश्न आहे. महापालिकेच्या तिजोरीत विकासकामांसाठी जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कामाचे टेंडर आता बंद राहणार आहेत. यामुळे भांडवली कामे सुचविलेल्या नगरसेवकांना महापालिकेच्या उत्पन्नाची वाट पाहावी लागणार  आहे. आता ही स्थिती किती दिवस राहणार हे सांगणे कठीण होऊन  बसले आहे. 

ही कामे थांबणारनगरसेवकांनी सन २0१७-१८ मधील भांडवली कामांची यादी मंजुरीसाठी दिली होती. यातील बºयाच सदस्यांची कामे प्रशासनाने मंजूर केली होती. या कामांत रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, पाणी पुरवठ्याच्या कामाचा समावेश आहे. या कामांचे टेंडर निघाले आहेत. पूर्वीचीच बिले थकीत असल्याने टेंडर घेण्यासाठी ठेकेदार पुढे आलेच नाहीत. त्यामुळे टेंडर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावून वेळ वाया घालविण्यापेक्षा कामेच थांबवा, अशा सूचना आयुक्तांनी लेखा विभागाला दिल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका