शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:21 IST

सोलापूर : भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाºया सायबर टेक कंपनीने कामाचे बिल न मिळाल्याने ...

ठळक मुद्देबिल थकले : मिळकतदारांना दिल्या जात आहेत हस्तलिखित पावत्यागेल्या आठ वर्षांपासून जीआयएसद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू सर्वेक्षणाच्या आधारे मिळकत कर आकारणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन

सोलापूर : भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाºया सायबर टेक कंपनीने कामाचे बिल न मिळाल्याने मिळकत करवसुलीचे आॅनलाईन सर्व्हर ठप्प केले आहे. यामुळे कर संकलन विभागाने आता लिखित स्वरूपात कर भरल्याच्या पावत्या देण्यास सुरुवात केली आहे. मुळातच कंपनीचे काम समाधानकारक नाही. त्यात कंपनीने असाच उशीर लावला तर महापालिका स्वतंत्र प्रणाली उभा करेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून जीआयएसद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे मिळकत कर आकारणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. नागरिकांनाही घरबसल्या गुगल मॅपवर आपल्या मिळकतीची माहिती पाहता येणार आहे. हे काम सायबर टेक कंपनीला देण्यात आले आहे. दीड वर्षांपूर्वी हे काम सायबर टेककडून काढून घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या कंपनीकडून काम करून घेण्याचा निर्णय घेतला, पण अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. 

मनपा उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील म्हणाले, सायबर टेक कंपनीला या कामाचे पाच कोटी रुपये देण्याचे ठरले आहे. आजवर अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. आणखी सहा हजार मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम बाकी आहे. यादरम्यान कंपनीने २५ लाख रुपये बिल मागितले आहे. प्रशासनाने मिळकतींची छायाचित्रे आणि लाईन डायग्रॅमचे काम पूर्ण करावे, असे कंपनीला सांगितले आहे. पण हे काम केलेले नाही. हे काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच बिल देऊ, अशी भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. जेवढे काम पूर्ण झाले आहे तेवढे पैसे कंपनीला देण्यात आलेले आहेत. 

तर मनपाचे अडीच कोटी वाचतील- जीआयएस सर्वेक्षणाचा संपूर्ण डाटा महापालिकेकडे आहे. सायबर टेक कंपनीने अर्धवट काम सोडले तर त्यांना अडीच कोटी रुपये देण्याचा प्रश्न नाही. मनपाचे अडीच कोटी रुपये वाचतील. आम्ही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घेऊ. कारण हे काम पूर्ण झाल्यास शहरातील हजारो मिळकतदारांचा फायदा होणार आहे. सध्या कर भरल्यानंतर पावत्या आणि सवलतींबाबचा निर्णय हस्तलिखित नोंदीच्या आधारेच घेतला जात आहे, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

नागरिकांची अडचण काय ?- सायबर टेकने सर्व्हर डाऊन केल्यामुळे नागरिकांना आता थेट कर संकलन विभागात जाऊन पैसे भरावे लागत आहेत. मिळकतकराचे डिजिटल पेमेंट केल्यास सवलत मिळते. सर्व्हर डाऊन असल्याने मनपाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पेमेंट गेटवे उपलब्ध होत नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTaxकरIncome Taxइन्कम टॅक्स