शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेने तयार केला २५ टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव, नव्या योजनेचा भार, प्रशासनाचा प्रस्तावाला होणार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:19 IST

आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे. 

ठळक मुद्देशहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पाणी पुरवठ्यावर मोठी तूट अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजना सुधारणेची कामे सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५  : आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे. प्रशासनाने सन २0१२—१३ च्या प्रचलित पाणीपट्टीत सन २0१८—१९ पासून २५ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पाणी पुरवठ्यावर मोठी तूट सहन करावी लागत आहे. शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी दर दिवशी प्रति माणसी ९0 ते १00 लिटर पाणी पुरवठा होतो असा दावा करण्यात आला आहे. अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजना सुधारणेची कामे सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने ते बदलणे व दुरूस्तीच्या खर्चात वाढ होत आहे. जलसंपदा विभागाकडून उजनीतून देण्यात येणाºया पाणीपट्टीत भरमसाठ वाढ केली आहे. नवीन दुहेरी जलवाहिनीचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने जादा निधी दिल्यास या कामाचे टेंडर काढण्यात येणार आहे. याबाबींचा विचार करता ना नफा ना तोटा या तत्वावर पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास घरगुती पाणीपट्टीत सुमारे ७५0 ़रुपयाची वाढ होणार आहे. अमृत योजनेतून २ कोटी ५९ लाख खर्चून विविध बागा हिरव्यागार करण्याच्या टेंडरचा मंजुरीचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये गंगानगर मोकळी जागा, कस्तुरबा बाग, विद्यानगर मोकळी जागा, शाह उद्यान, वसंतविहार:२ मधील मोकळी जागा, नवे विडी घरकुल, सदिच्छानगर (सिव्हिल वर्क टेंडर: ३९ लाख ९७ हजार), विद्यानगर, शाह उद्यान (हॉर्टीकल्चर: ६४ लाख १८ हजार), वसंतविहार, विडी घरकुल, सदिच्छानगर (हॉर्टीकल्चर: ३६ लाख ८ हजार), जानकीनगर (हॉर्टीकल्चर: २९ लाख ७१ हजार), गंगानगर, कस्तुरबा बाग (हॉर्टीकल्चर: ५९ लाख ७८ हजार), आसरा पूल ते मजरेवाडी रेल्वेगेटपर्यंत वृक्षारोपण करणे (२९ लाख ६७ हजार) या कामांना वर्कआॅर्डर देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच हायलेव्हल झोन व मेडिकल पंपहाऊस येथे नवीन ९0 एचपीचे पंप बसविण्याची वर्कआॅर्डर (खर्च: ८१ लाख ५६ हजार) देण्याचा प्रस्ताव आहे.-------------------जाहीरनामा तपासून पहा : आनंद चंदनशिवेप्रशासनाने पाठविलेली २५ टक्के पाणीपट्टी वाढ आम्ही हाणून पाडू. दररोजच्या पाणी पुरवठ्याची सध्याची पाणीपट्टी आकारली जाते, पण पाणी तीन,चार ते सहा दिवसाआड दिले जाते.अगोदर पाणीपुरवठा सुरळीत करा मग पाणीपट्टी वाढीच ेपाहू.निवडणूक होऊन २३ फेब्रुवारी रोजी एक वर्ष होत आहे.अशात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपने पाणीपट्टी वाढीचे पाप करू नये.त्यांनी निवडणूक जाहीरनामा तपासून पाहावा. असे बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका