शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सोलापूर महापालिका आणि सिध्देश्वर देवस्थान कमिटीतील वाद यात्रेनंतरही कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:43 IST

सोलापूर : सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने होम मैदानाचा ताबा महापालिकेकडे दिल्याने मैदानावर यात्रेनिमित्त लागलेले बहुतांश स्टॉल गेल्या दोन दिवसांत हटविण्यात ...

ठळक मुद्देसिध्देश्वर यात्रा संपली, होम मैदान रिकामे, नुकसानभरपाई वसुलीकडे लक्षवीज कनेक्शन तोडले : आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाईसिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या काळासाठी होम मैदानाचा ताबा पंचकमिटीला देण्यात येतो

सोलापूर : सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने होम मैदानाचा ताबा महापालिकेकडे दिल्याने मैदानावर यात्रेनिमित्त लागलेले बहुतांश स्टॉल गेल्या दोन दिवसांत हटविण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत मैदान रिकामे होईल. यात्रा काळात मैदानाचे नुकसान झाल्याचा दावा निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने केला आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी सुरू झालेला महापालिका आणि देवस्थान कमिटीतील वाद यात्रेनंतरही कायम राहण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या काळासाठी होम मैदानाचा ताबा पंचकमिटीला देण्यात येतो. यात्रेनिमित्त मैदान आणि परिसरात लागलेले स्टॉल १० फेब्रुवारीपर्यंत कायम असतात. यावर्षी मैदानाच्या हस्तांतरावरुन पंचकमिटी आणि महापालिका प्रशासनात वाद झाले होते. होम मैदानाचे सुशोभीकरण करणाºया कंपनीने मैदानाचे नुकसान झाल्याचा अर्ज महापालिका आयुक्तांना दिला होता.

३१ जानेवारीला मुदत संपल्यामुळे होम मैदान तातडीने रिकामे करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पंचकमिटीला दिले होते. यादरम्यान, पंचकमिटीने मुदतवाढीसाठी अर्ज दिला होता. परंतु, आयुक्तांनी हा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पंचकमिटीने स्टॉलधारकांना तातडीने स्टॉल बंद करुन साहित्य उचलून नेण्याचे आदेश दिले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर स्टॉल हटविण्याचे काम सुरू होते. 

पंचकमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे म्हणाले, होम मैदानावरील सर्व साहित्य सोमवारी सायंकाळपर्यंत काढण्यात येईल. सिध्देश्वर मंदिराकडील रस्ता ते विजापूर वेस या भागात लावलेल्या स्टॉलचे वीजकनेक्शन बंद करण्यात आले आहे. सोमवारी हे स्टॉल काढण्यात येतील. मैदानाचा ताबा महापालिकेकडे देण्यात आला आहे. यानंतर इतर गोष्टींवर आम्ही बोलणार आहोत. 

नुकसानभरपाई वसूल करणार - स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात्रा काळात वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला लावलेली झाडे, फरशा, बाकडे आणि साउंड यांचेही नुकसान झाल्याचा दावा निखिल कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी, महापालिका अधिकाºयांनी केला आहे. सोमवारी पुन्हा पाहणी करुन त्याचा अहवाल आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात येणार आहे. मैदानाची नुकसानभरपाई देवस्थान समितीकडून वसूल करण्यात येईल. शिवाय आराखड्याला डावलून रस्त्यावर स्टॉल टाकल्याप्रकरणी कारवाई होईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका