शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले आयुक्त अविनाश ढाकणे यांना पेढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:01 IST

मनपाने सादर केलेल्या ६९२ कोटीच्या समांतर जलवाहिनी मंजूर झाल्याचा आनंद

ठळक मुद्देदोन दिवसात निविदा निघण्याची शक्यता महापालिकेत पदाधिकारी व अधिकाºयांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर

सोलापूर : मनपाने सादर केलेल्या ६९२ कोटीच्या समांतर जलवाहिनीला शासनाने मंजुरी दिल्याच्या आनंदप्रित्यर्थ महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना गुरूवारी सायंकाळी पेढे देऊन आनंद व्यक्त केला.

शनिवार दि. ३१ मार्च रोजी सभा तहकुब झाल्यावर महापौर बनशेट्टी या आयुक्तांवर भडकल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकारानंतर आयुक्त डॉ. ढाकणे बैठकांसाठी मुंबई व दिल्लीला गेले होते. गुरूवारी ते परत आले. सायंकाळी ६ वा. ते आपल्या कार्यालयात कामकाज करीत असतानाच महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नागेश वल्याळ, किसन जाधव, श्रीशैल बनशेट्टी, सुभाष शेजवाल आदी त्यांच्या कार्यालयात आले. महापौर बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. ढाकणे यांना समांतर जलवाहिनीला मंजुरी मिळाली का असा सवाल केला. त्यावर आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अद्याप तरी तसे पत्र आलेले नाही.

मनपाने नगरविकास खात्याला दिलेला हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केल्यामुळे याबाबत दोन दिवसात अद्यादेश निघणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या आनंद प्रित्यर्थ महापौर बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. ढाकणे, उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील व उपस्थितांना पेढे वाटून महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागत असल्याबाबत आनंद व्यक्त केला. गुरूवारी दुपारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समांतर जलवाहिनीला शासनाची मंजुरी मिळाली आहे.

दोन दिवसात निविदा निघण्याची शक्यता आहे असे वक्तव्य केले होते. ही वार्ता कानी आल्यावर महापौरांसह इतर सर्वांनी आयुक्तांकडे धाव घेतली. पालकमंत्री देशमुख यांनी त्यांच्या गोटातील नगरसेवकांनाही ही बाब सांगितली नाही हे विशेष. पण समांतर जलवाहिनी मंजुरीच्यानिमित्ताने महापालिकेत पदाधिकारी व अधिकाºयांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर होण्यास मदत झाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका