शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सोलापूर बाजार समितीच्या गणांमध्ये हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश, जिल्हाधिकाºयांचे स्पष्टीकरण, आरक्षणाची लॉटरी आज काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:38 IST

हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल.

ठळक मुद्देबाजार समितीच्या निवडणुकीत यंदा कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मतदानाचा अधिकारसोलापूर बाजार समितीचे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र यादी तयार करण्याचे आदेश उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना दिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सोलापूर बाजार समितीचे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यातील गावांची यादी जिल्हाधिकाºयांकडे सादर करून गणनिश्चिती करण्याचे काम सुरू आहे. यापार्श्वभूमीवर बाजार समितीच्या प्रशासनाने हद्दवाढ भागात गेलेली उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावे वगळून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर केल्याची चर्चा होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, ही गावे वगळण्याचा प्रश्न नाही. शासनाने बाजार समितीचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. महापालिका हद्द असली तरी या भागातही शेती असू शकते. येथील शेतकºयांचाही समावेश होऊ शकतो. मुळात तहसीलदारांनी गावे निश्चित करून द्यायची आहेत.  लवकरच १५ गण निश्चित करण्याची कार्यवाही होईल. --------------तहसीलदारांना दिले आदेश- बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी सभापती दिलीपराव माने यांच्या गटात मुख्य सामना रंगणार आहे. यात आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांचीही भूमिका महत्त्वाची असेल; मात्र सध्या देशमुख आणि माने यांच्यात प्रशासकीय पातळीवरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. प्रशासनाकडे सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ९० गावांचा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ३८ गावांचा समावेश करण्यात आला होता. हद्दवाढ भागातील १४ गावे वगळण्यात आली होती. दिलीप माने गटाने यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे आक्षेप नोंदविले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी हद्दवाढ भागातील गावांचा समावेश करूनच यादी तयार करण्याचे आदेश उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत.  ---------------ही गावे वगळली होती कसबे सोलापूर, मजरेवाडी, नेहरूनगर, सलगरवाडी, केगाव, शिवाजी नगर, बाळे, कुमठे, सोरेगाव, प्रतापनगर, शेळगी, दहिटणे, देगाव, बसवेश्वर नगर आदी गावे वगळण्यात आली होती. आता या गावांसह बाजार समितीचे गण निश्चित होणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर