शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

By संताजी शिंदे | Published: April 28, 2024 1:34 PM

Solapur News: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत.

- संताजी शिंदे सोलापूर - मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. याच दिवशी मनोज जरांगे-पाटील हेही सोलापूरात येणार आहेत, मात्र ते पुढे सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत.

सध्या निवडणूकीचे वातावरण तापलेले असताना, अचानक मनोज जरांगे-पाटील यांचा दौरा असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी दिली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे सोलापुरातील मरीआई चौक येथे आगमन होणार आहे. आगमना दरम्यान त्यांचे स्वागत होणार असून, ते पुढे मंगळवेढा, सांगोला मार्गे सांगली येथे जाणार आहेत. सांगलीमध्ये रात्रीचा मुक्काम करून ते पुढे बेळगाव येथे होणाऱ्या एका जाहीर सभेला जाणार आहेत. सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासारखी दिग्गज मंडळी सोलापूरात येत आहेत.

राजकीय नेत्यांच्या धामधूमीत निवडणूकीचे वातावरण ढवळून निघत असताना, अचानक सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे शहर परिसरातील वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच जरांगे पाटील यांनी ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा..! असा संदेश मराठा समाजाला दिलेला होता. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी गाव भेट आणि संवाद दौरा होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे होत आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Solapurसोलापूर