शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:42 IST

माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई/सोलापूर - माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. उद्या सकाळी 10 वाजता दसूर तालुका माळशिरस येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हनुमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती.माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांनी आज सैफी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले होते. 

1999 ते 2005पर्यंत माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उभारणीत त्यांनी योगदान दिलं होतं. 13 ऑक्टोबर 2009मध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. 16226 एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले होते, माळशिरस मतदारसंघाचं त्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केलं. माळशिरसचे आमदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. 

हनुमंत डोळस हे मोहिते-पाटील घराण्याचे विश्वासू सहकारी होते. कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासलेले हनुमंत डोळस गेल्या वर्षभरापासून मृत्यूशी झुंज देत होते. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1985पासून दरवर्षी मातोश्री कलावती डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करायचे.

टॅग्स :Solapurसोलापूर