आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती रंगभवन येथे सकाळी दहा वाजता हा सोहळा आयोजित केला असून, महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या स्टार्सचा सत्कार होईल. माजी मंत्री आमदार दिलीप सोपल समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 09:52 IST
‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान
ठळक मुद्देमहासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या स्टार्सचा सत्कार