शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

सोलापूर लोकमत भवनमध्ये साकारली चिऊताईची शेकडो घरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:22 IST

सोलापुरात अनोखी मोहीम :  महापौरांनीही बनविलं स्वत:च्या हातानं घरटं; पक्षीप्रेमींचा जमला मेळा

ठळक मुद्देमहापौरांनीही बनविलं स्वत:च्या हातानं घरटं; पक्षीप्रेमींचा जमला मेळाशहराच्या प्रथम नागरिक शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’ने राबवलेल्या ‘चिमण्यांचं घरटं’ बनवण्याची मोहीम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.

सोलापूर: घराघरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढावा, यासाठी ‘सोलापूरलोकमत’ने आयोजित केलेल्या ‘तुम्हीच बनवा चिमणीचं घरटं’ या कार्यशाळेला शेकडो सोलापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी ‘लोकमत भवन’मध्ये दस्तुरखुद्द शहराच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनीही बालगोपाळ अन् आबालवृद्धांच्या समवेत चिमण्यांचं घरटं बनवून ही चळवळ अधिक व्यापक होण्याची अपेक्षाही व्यक्त केली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महापौर शोभा बनशेट्टी, पर्यावरण अभ्यासक निनाद शहा, डॉ.  वासुदेव रायते यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि रोपास पाणी घालून कार्यशाळेस प्रारंभ झाला. शहराच्या प्रथम नागरिक शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’ने राबवलेल्या ‘चिमण्यांचं घरटं’ बनवण्याची मोहीम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. यातून नक्कीच सोलापूर शहरात चिमण्यांची संख्या वाढीस लागेल. या उपक्रमासाठी आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या वतीनेही सहकार्य करू,  अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

चिमण्यांबद्दल आपुलकी असलेल्या मंडळींनी सकाळी ९ वाजल्यापासूनच ‘लोकमत’च्या कार्यालयात आवर्जून हजेरी लावली. कार्यशाळेत शेकडोंनी सहभाग दर्शवलेल्या सोलापूरकरांना निसर्ग माझा सखाचे अरविंद म्हेत्रे, वन्यजीवप्रेमी शिक्षक मुकुंद शेटे, निसर्गप्रेमी शिक्षक शिवानंद हिरेमठ, वाईल्ड फोटोग्राफर रणजित शेळके, बसवराज बिराजदार यांनी चिमण्यांसाठी घरामध्ये घरटं कसं बनवावं अन् चिमण्यांची काय दक्षता घ्यावी, अशा माहितीबरोबरच उपस्थितांच्या शंकांचेही समाधान केले. तसेच घरटं बनवण्याचं प्रात्यक्षिकही करुन दाखवलं. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत: बनवलेलं हे घरटं आपल्या घरी बसवण्यासाठी नेलं. घरटं बनवण्यासाठीचं साहित्य लोकमत आणि निसर्ग माझा सखा परिवाराच्या वतीने पुरवण्यात आलं.

या कार्यशाळेत घरटी बनवण्यासाठी लागणाºया साहित्यासाठी अनेकांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. चंद्रा डिजिटलचे दास यांनी कागदी रोल उपलब्ध करुन दिला तर होटगी रोड एमआयडीसीतील ओम प्लास्टिक कंपनीने पुठ्ठे दिले. निसर्ग माझा सखा परिवारातील सदस्य बसवराज बिराजदार यांंनी १०० घरट्यांसाठी आपलं योगदान दिलं. प्रत्येकाने आपापल्या परीने दिलेल्या योगदानामुळेच चिमण्यांचं घरटं पूर्ण होऊ शकलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. एकीचं बळ काय असतं याची प्रचिती या निमित्तानं आली. याशिवाय शेकडोंच्या संख्येने आलेल्या लोकांना घरट्यांबद्दलच्या टिप्स देण्यासाठी पल्लवी म्हेत्रे, शोभा शेटे, समर्थ म्हेत्रे, प्रवीण जेऊरे, मल्लिकार्जुन धुळखेडे,आदित्य म्हेञे, गणेश बिराजदार, सचिन पांढरे, शिवाई शेळके, वागेश शास्त्री या निसर्गप्रेमी मंडळींनीही आपली भूमिका बजावली.

चिमुकल्यांपासून ते आजीबाईपर्यंत..-  ‘लोकमत’ने ‘निसर्ग माझा सखा’ या संस्थेला सोबत घेऊन ‘घर तेथे घरटी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी सकाळी ‘लोकमत’च्या कार्यालयात कार्यशाळा झाली. चिमुकल्या बालकांपासून ते सत्तर वर्षांच्या आजीबाईपर्यंत सर्वस्तरातील मंडळींनी या उपक्रमात सहभागी नोंदविला.

निसर्ग आणि मानवता जगवणं याचं महान उदाहरण म्हणजे आज आयोजित केलेला चिऊताईचं घरटं हा कार्यक्रम. ‘लोकमत’ने हा उपक्रम राबवून आपल्या सामाजिक कर्तव्याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण निसर्गपें्रमीसमोर ठेवले. आज मिळालेला पक्षीप्रेमींचा प्रतिसाद हा एक आशेची नवी दिशा समजायला हवं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण या उत्कृष्ट संकल्पनेत उत्कटपणे सहभागी झाला होता. चिमण्यांची अवस्था माळढोक पक्ष्याप्रमाणं होऊ नये असे प्रत्येकालाच वाटले. निसर्ग आणि माणूस यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून चिमण्यांच्या अस्तित्वाकडे पाहिले पाहिजे. वाढती सिमेंटची जंगले, मोबाईल टॉवर आणि वातावरणातील प्रदूषण यामुळे या मुक्या जीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशावेळी सावधानतेची घंटा वाजवून ‘लोकमत’ने लोकजागरणाचे काम केले आहे. प्रत्येक जण आपल्या घरी असा पक्ष्यांचा अधिवास वाढविल्यास ही वसुंधरा पुन्हा हरितगर्भ होईल. ‘लोकमत’चे त्रिवार अभिनंदन- डॉ. वासुदेव रायते, सृष्टीमित्र संघटना, सोलापूर. 

पर्यावरण रक्षण आणि पक्षी संवर्धनाचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून ‘लोकमत’ने हाती घेतलेला घरटी तयार करण्याचा उपक्रम संपूर्ण समाजासाठी कृतिशील आहे. निसर्ग हा सर्वांचा सखा असल्याने अशा विषयात सर्वांनीच लक्ष घालायला हवे.. अलीकडे पर्यावरणावर सारेच बोलतात, कृती मात्र दिसत नाही. ‘लोकमत’ने मात्र त्याही पुढे जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी कार्यशाळा घेतली. यात सहभागी झालेले आबालवृद्ध पाहिल्यावर निसर्गाबद्दल नव्या पिढीमध्ये आवड असल्याचे जाणवत आहे. जनता जागरुक असल्याने कृतिशील उपक्रम दिसला. मोबाईल टॉवर आणि कॉलन्यांच्या जमान्यात शहरातून आणि गावांतून चिमण्या हद्दपार होताना दिसत आहेत. मात्र ‘लोकमत’च्या या उपक्रमातून त्यांना शहरी वस्त्यांमध्ये आश्रय मिळेल.- निनाद शहा, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :SolapurसोलापूरLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंटbirds sanctuaryपक्षी अभयारण्य