शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली

By appasaheb.patil | Updated: April 18, 2019 11:34 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतसोलापूर लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगाकाँग्रेसकडूनही मतदान यंत्र बिघाडबाबत निवडणुक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. दरम्यान सकाळच्या सत्रात सोलापूर शहर, अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली़ यामुळे सकाळच्या सत्रातील मतदान टक्केवारीत मोठी घट झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिध्देश्वर महास्वामी तर वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासह १३ जण निवडणुक रिंगणात आहेत. सकाळच्या सत्रात सोलापुरातील कुमठा नाका, मंद्रुप येथील सेवालाल नगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव, आचेगांव, पंजाब तालीम सोलापूर महापालिका उर्दू शाळा क्र. २ यासह आदी शहरातील बहुतांश व ग्रामीण भागातील गावातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाची टक्केवारी घटली आहे़ मात्र दहानंतर बºयाच केंद्रावरील मतदान यंत्र सुरू करण्यात आले़ सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत आहे.

शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे वेळ वाढवून मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे़ याशिवाय काँग्रेसकडूनही मतदान यंत्र बिघाडबाबत निवडणुक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरVotingमतदान