शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: शॉटसर्किटमुळे लॉन्ड्री व्यवसायीकाचे घर जळून खाक, मडकी वस्ती येथील प्रकार

By संताजी शिंदे | Updated: July 15, 2023 13:13 IST

Solapur: पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील एका लॉंड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत मोटारसायकल, संसाय उपयोगी साहित्यासह १० लाखाचे नुकसान झाले.

- संताजी शिंदे

सोलापूर - पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील एका लॉंड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत मोटारसायकल, संसाय उपयोगी साहित्यासह १० लाखाचे नुकसान झाले.

पुणे महामार्गावरील गणेश नगर मडकी वस्ती येथील एका घरात अचानक शॉटसर्किट झाला. त्यामुळे पत्र्याच्या घरातील आतील साहित्याला आग लागली. आग लागल्यानंतर धुराचे लोळ बाहेर पडू लागले, कुटुंबियांनी तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण केले. अग्नीशामक दल व फौजदार चावडीचे पोलिस काही मिनीटात घटनास्थळी दाखल झाले, जवानांनी पाण्याचा मारा करण्यास सुरूवात केली. काही जवानांनी जीव धोक्यात घालून घरातील गॅसची टाकी बाहेर काढली. जोरात पाण्याचा मारा केल्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आली. आग विझल्यानंतर पाहिले असता, आतील मोटारसायकल, ईस्त्रीसाठी आलेले कपडे, संसार उपयोगी साहित्य, कपाट व त्यातील कपडे, दागिने, पैसे आदी साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. आग लागलेले घर हे पांडूरंग काटकर यांचे असल्याचे समजते. त्यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे.

गॅसची टाकी काढल्याने अनर्थ टळलाअग्निशामक दलाच्या जवानांनी आग लागलेली असताना, धोकादायक स्थितीत घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरात असलेली गॅसची टाकी बाहेर काढली अन ती लांबच्या अंतरावर ठेवली. टाकीचा जर स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही धोका झाला असता अशी माहिती अग्नीशामक दलाचे अधिक्षक केदार आवटे यांनी दिली.

कुटुंबीयांना दिला धीरआग लागल्या नंतर काटकर कुटुंबीय भयभीत झाले होते. अग्नीशामक दलाने आग विझवल्यानंतर घरात काहीच राहिल नसल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे लॉंड्रीचा व्यवसाय असलेल्या काटकर कुटुंबियांवर आसमानी संकट कोसळले. दरम्यान घटनास्थळी गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बिज्जू प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुरेश तोडकरी यांनी कुटुंबियांना धिर दिला. हातावर पोट असलेल्या या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग