शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लाड-पागे शिफारशीच्या नोकरभरतीची स्थगिती उठवली! महाराष्ट्र राज्य मनपा, नपा फेडरेशन संघटनेच्या पाठपुराव्याला यश

By संताजी शिंदे | Updated: June 25, 2024 19:55 IST

Solapur News: लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

- संताजी शिंदे सोलापूर - लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने २३ मार्च २०२३ रोजी लाडपागे अंतर्गत पाल्यांच्या नोकर भरतीला स्थगिती दिली होती. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये हजारो कर्मचारी लाडपागे नोकरी पासून वंचित राहिले होते. स्थगितीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन संघटनेने १० ऑगस्टमध्ये २०२३ रोजी मुंबई युनियन कार्यालय या ठिकाणी बैठक घेतली होती. बैठकीत सुरेश ठाकूर, बबनराव झिंजुर्डे, प्रवक्ते ॲड. गौतम खरात, संतोष पवार, अनिल जाधव, गणेश शिंगे, बापूसाहेब सदाफुले व महाराष्ट्रातील मनपाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास ठराव पास केला होता.

 स्थगिती दिल्यापासून आजतागायत सर्व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. २४ जून २०२४ रोजी लाड-पागे शिफारीनुसार एस.सी. प्रवर्गातील नव बौद्ध महार, मातंग या समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिला. न्यायमूर्तींनी अनुसूचित जाती मधील सर्व जातीच्या कामगाराना लाड व पागे कमिटीनुसार असलेल्या वारस  नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे, मात्र उर्वरित खुला प्रवर्गया निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.या निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. व इतर मागास प्रवर्गातील कामगार यांना लागू असलेली स्थगिती कायम ठेवलेली आहे.

माझ्या २९० कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला - बापू सदाफुलेमागासवर्गीयांमध्ये सध्या एकच हक्काची नोकरी राहिली आहे. स्थगिती मिळाल्याने मेहतर व भंगी या दोन जाती वगळता इतर जातीमधील वारसाहक्काच्या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यांना मोल मजूरीशिवाय पर्याय राहिला नव्हता, आम्ही सातत्याने औरंगाबाद खंडपिठात पाठ पुरावा केला. अखेर दहा महिन्यानंतर खंडपिठाने नोकरभरतीवरील स्थगिती उठवली आहे. यामुळे महानगरपालिकेतील माझ्या २९० न्याय मिळाला असल्याची भावना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापू सदाफुले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूर