शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: "जे जे घडतंय ते बघत राहायचं, काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नाही"; सुशीलकुमार शिंदेंचा दावा

By appasaheb.patil | Updated: July 13, 2023 16:05 IST

Sushilkumar Shinde : राज्याच्या राजकारणात जे घडलंय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आता फक्त जे जे घडतंय ते फक्त बघत राहायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली मात्र काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नसल्याचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - राज्याच्या राजकारणात जे घडलंय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आता फक्त जे जे घडतंय ते फक्त बघत राहायचं. ज्या पध्दतीने दोन - दोन मुख्यमंत्री झालेत, ती नवी प्रथा आता महाराष्ट्रात सुरू झाली का काय असेच वाटत आहे असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली मात्र काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नसल्याचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस कधीच फुटणार नसल्याचा दावा केला. राष्ट्रवादी फोडण्यात आली त्यानंतर आता काँग्रेस फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत, याबाबत सुशीलकुमारांना विचारले असता ते म्हणाले की, मला नाही वाटत काँग्रेस फुटेल. काँग्रेस विचाराने पक्की आहे. काँग्रेस कधी फुटणार नाही. मागे एकदा फुटली ते झालं आता यापुढे कधीही फुटणार नसल्याचे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. 

तीन पक्षाचे सरकार राज्यात आले आहे, त्याबाबत काय सांगाल असे पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले की, आता ते बघायचं आहे. कशा पध्दतीने सरकार चालवितात. राष्ट्रवादी एकदा फुटलेली आहे, आता त्यांना ओढून परत आणता येणार नाही. त्यामुळे आता निरीक्षण करणे गरजेचे आहे. निवडणुका येत आहेत. सर्वसामान्य जनताच आता त्यांना धडा शिकवेल याविषयी माझ्या मनात शंका नसल्याचेही शिंदे म्हणाले. नव्या परिस्थितीत जे जे होतंय ते पाहायचं आहे. नव्या राजकारणांवर सर्वसामान्य लोक चिडले आहेत, याचा नक्कीच परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल असेही शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र