शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: ‘सिंचन’ च्या निवृत्तांचे उपोषण मागे; दोन महिन्यात प्रश्न सोडविणार 

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 29, 2022 19:07 IST

Solapur: माजी आमदार आडम यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसोबत या प्रश्न बैठक घेतली. बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर : सिंचन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अखेर चक्री उपोषण थांबवले. आमदार प्रणिती शिंदे व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या मध्यस्थीनंतर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी पुढील दोन महिन्यात सोडवू. त्या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी चक्री उपोषण मागे घेतले.

माजी आमदार आडम यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसोबत या प्रश्न बैठक घेतली. बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वय वर्ष ४५ दरम्यान प्रशिक्षण व विभागीय परीक्षेतून सूट न दिल्याने जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदापासून वंचित राहिले आहेत.

शासनाच्या सूचनेनुसार १३ पदावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सूट देण्याची मागणी सेवानिवृत्त स्थापत्य सहायक व क्षेत्रीय कर्मचारी कृती समितीकडून होत आहे. मागणी मान्य होत नसल्याने मागील १८ दिवसांपासून सेवानिवृत्त कर्मचारी सिंचन भवनासमोर चक्री उपोषण केले. यातील दोन उपोषणकर्त्यांची आंदोलनस्थळी तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. या प्रकरणी ‘ लोकमत ’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरNarsayya Adamनरसय्या आडमPraniti Shindeप्रणिती शिंदे