शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:08 IST

गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५२५९ मातांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सरकारकडे सादरकेंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी मातृवंदना योजनेची घोषणा केलीशासकीय आणि निमशासकीय महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही माता, बालकांचे आरोग्य आणि लसीकरण हा योजनेचा  मुख्य उद्देश

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५  : गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. जननी सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील ५२५९ मातांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सरकारकडे सादर केली आहे.  केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी मातृवंदना योजनेची घोषणा केली होती. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत ही योजना काही ठराविक राज्यातच कार्यरत होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवर्गाची अट नाही; मात्र पहिल्या अपत्यासाठीच लाभ मिळणार आहे. शासकीय आणि निमशासकीय महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा यांनाही गरोदरपणात लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुण्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी कार्यशाळा झाली होती. जिल्ह्यातील आरोग्यसेवकांना या योजनेबाबत माहिती देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या योजनेबरोबरच जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. गर्भवतींकडून तीन प्रकारचे अर्ज भरून घेण्यात येतील. माता, बालकांचे आरोग्य आणि लसीकरण हा योजनेचा  मुख्य उद्देश आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोफत केले जाते. त्याचबरोबर आता थेट अनुदान मिळाल्यामुळे आहाराकडेही लक्ष राहील. यंदाच्या वर्षी जननी सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील ५२६९ यादी सरकारला सादर करण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर इतर महिलांची यादी पाठविण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.------------------------------अशी मिळणार मदत - १०००/- नोंदणीवेळी(नोंदणी लवकरात लवकर १५० दिवसांत आवश्यक)- २०००/- सहा महिन्यांचे गरोदरपण पूर्ण झाल्यावर(किमान एक तपासणी)- २०००/-  प्रसूतीनंतर लसीकरण पूर्ण झाल्यावर.हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल.--------------------लसीकरण कार्ड महत्त्वाचे या योजनेचा लाभ देण्यासाठी लसीकरण कार्ड (एमसीपी कार्ड) ही महत्त्वाची गोष्ट आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड किंवा सरकारी नियमानुसार आवश्यक असलेला फोटोप्रुफ ओळखपत्र देणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पासूनच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांनी नेमका कुठे अर्ज करायचा याबाबतची माहितीही लवकरच जारी करण्यात येईल. - डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद