शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’

By admin | Updated: February 24, 2017 18:33 IST

सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’

सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’इरफान शेख - आॅनलाइन लोकमत कुर्डूवाडीमाढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादीचेच विजयी झाले असून २५ वर्षांपासून निघालेला आ. बबनराव शिंदे व संजय शिंदे यांच्या विकासाचा अश्वमेध आजपर्यंत रोखण्यात विरोधकांना अपयश आले. यामुळे ते यंदाही फेल झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. आ. शिंदे यांनी तालुक्यात कोणालाही, कुठेही उभे करू द्या, जनता त्यांच्यावर विश्वास टाकून निवडूनच देतात. शिंदे कुटुंबीयांनी तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी आपला झेंडा अटकेपार लावला आहे. यात आ. बबनराव शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र रणजितसिंह शिंदे हे मानेगाव गटातून, विक्रमसिंह शिंदे हे बेंबळे गणातून, पुतणे धनराज शिंदे हे लऊळ गणातून तर बंधू संजय शिंदे हे कुर्डू गटातून उभे राहून निवडून आले. पंचायत समिती निवडणुकीत लऊळ गणातील धनराज शिंदे हे ६ हजार ४९ मताधिक्याने तर जिल्हा परिषदेसाठी कुर्डू गटातील संजय शिंदे हे ८ हजार ८५९ मताधिक्याने निवडून आले आहेत. या दोन्ही चुलत्या, पुतण्यांचे मताधिक्य सर्वाधिक आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच उमेदवार दीड हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत तर पंचायतीचे १४ पैकी ११ उमेदवार दीड हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. माढा तालुक्यात जि. प. च्या सात व पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. आ. शिंदे व संजय शिंदे या बंधूंविरोधात सर्वच पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवित होते, तर शिवसेनेनेही इतर पक्षांशी छुपी आघाडी केली होती. मात्र त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. गत निवडणुकीत पंचायत समितीच्या चार जागा शिंदे गटाच्या विरोधकांकडे होत्या. त्या जागाही हिसकावून घेण्यात शिंदे बंधू यशस्वी ठरले आहेत. मानेगाव व मोडनिंब येथील लढत सर्वात जास्त चर्चेत होती. ऐनवेळी पं. स. चे माजी सभापती रणजितसिंह शिंदे यांना मोडनिंब गटातून मानेगाव गटात राष्ट्रवादी पुरस्कृत होऊन जावे लागले. तेथे त्यांची लढत शिवसेनेचे शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत व माजी आ. धनाजीराव साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे यांच्याशी झाली. यात ते विजयी झाले.मोडनिंब गटात गेल्या चार वेळेस जि. प. वर निवडून आलेले जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी ऐनवेळी आपला अपक्ष अर्ज भरून राष्ट्रवादीच्या भारत शिंदे यांना कडवी लढत दिली. मात्र त्यात त्यांचा १,६५५ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात सोशल मीडियावर प्रचार अधिक प्रमाणावर झाला, जातीय समीकरणे मांडण्यात आली. मात्र राष्ट्रवादी यातही विजयीच ठरली.--------------------------निमगाव हीच राजधानीनिमगाव टें. हे गाव माढा तालुक्यातील कपाळाला कोंदले गेले असून शिंदे कुटुंबातील एकाच छत्राखाली राष्ट्रवादीचे आ. बबनराव शिंदे, दोन जिल्हा परिषद सदस्य त्यापैकी अपक्ष संजय शिंदे, दुसरे राष्ट्रवादी पुरस्कृत रणजितसिंह शिंदे व राष्ट्रवादीचे दोन तालुका पंचायत सदस्य आहेत. काही दिवसातच आमदारांसह जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांचेही वास्तव्य होईल, अशी चर्चा आहे.-------------------------------संजय शिंदे सर्वाधिक मतांनी विजयीतालुक्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत कुर्डू जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानीचे संजय विठ्ठलराव शिंदे यांना १५,१७४ तर शिवसेनेचे भारत पाटील यांना ६,३१५ मते पडली आहेत. ८, ८५९ मतांनी स्वाभिमानीचे संजय विठ्ठलराव शिंदे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या अंजनादेवी शिवाजी पाटील यांना १०,७८७ तर शिवसेनेच्या सुनीता संजय पाटील ९,३२७ मते पडली आहेत. राष्ट्रवादीच्या अंजनादेवी पाटील या १,४६० म्हणजे सर्वात कमी मतांनी विजयी झाल्या आहेत.