शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Politics; सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे नको; उमेदवार स्थानिकच हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:46 IST

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे हे बाहेरचे उमेदवार नको. गौडगाव मठाचे मठाधिपती श्री शिवाचार्यरत्न डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी ...

ठळक मुद्दे जयसिध्देश्वर शिवाचार्यांना नेत्यांचा पाठिंंबा असल्याचा दावासोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव महास्वामींच्या उमेदवारीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाठिंबा

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे हे बाहेरचे उमेदवार नको. गौडगाव मठाचे मठाधिपती श्री शिवाचार्यरत्न डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपच्या अनेक नेत्यांची मागणी आहे. तसे पत्र आम्ही भाजपच्या केंद्रीय समितीला पाठविण्यात आल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मेंगजी म्हणाले, भाजपच्या केंद्रीय समितीने लोकसभेच्या उमेदवारीबाबत आजी-माजी आमदार आणि खासदारांकडून मते मागविली आहेत. माझे मत नोंदविताना मी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली. खासदार शरद बनसोडे यांच्यामुळे आमची आधीच अडचण झाली आहे. ते सोलापुरात येतात कधी आणि जातात कधी हे कळत नाही. दिल्लीत काही कामे असली की कार्यकर्त्यांची अडचण होते. त्यात पुन्हा शरद बनसोडे यांच्याऐवजी खासदार अमर साबळे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे.

अमर साबळे निवडून आले तर पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांची अडचण होईल. त्यांना शोधायला बारामती किंवा दिल्लीत जावे लागेल. त्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिल्यास सगळीच अडचण दूर होणार आहे. सोलापूर उत्तर, मध्य, दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा या भागातून त्यांना सर्वाधिक मतदान होईल. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपक्षा कमी खर्चात ते निवडून येतील. सुशीलकुमार शिंदे यांना कायमचे रोखले जाईल. महास्वामींच्या उमेदवारीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाठिंबा आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक महास्वामींच्या बाजूने आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

महास्वामींच्या जातवैधता प्रमाणपत्राची खात्री केली- मेंगजी म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे जातवैधता प्रमाणपत्र आहे. भाजपच्या केंद्रीय समितीतील काही लोकांनी त्याची खात्री करुन घेण्यास सांगितले होते. त्यानुसार खात्री करुन घेण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच यात लक्ष घातल्यामुळे महास्वामींच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल,असे वाटते. स्थानिक उमेदवारामुळे मतदारांना निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक