शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्याला मिळणार १०% अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:32 IST

सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांची माहिती, आरोग्य उपसंचालकांनी दिले आश्वासन

ठळक मुद्देराज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडाशासनाने विशेष धोरण ठरविण्याची गरजहाफकीन जीव औषधी मंडळाऐवजी जिल्हास्तरावर औषध खरेदीला परवानगी मागण्याचा निर्णय

राकेश कदम  सोलापूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य भांडारात पुरेसा औषध साठा आहे. यात्रेनंतर औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा उपसंचालक (पुणे) डॉ. संजय देशमुख यांनी जिल्हा स्तरावर औषध खरेदीसाठी १० टक्के अनुदान मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी दिली. 

आषाढी यात्रेपूर्वी आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या जिल्ह्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे. परंतु, प्रश्न मार्गी लागत नाही. यासंदर्भातील वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. यानंतर राज्यस्तरावरील यंत्रणा जागी झाली.

आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, आरोग्य सेवाचे संचालक डॉ. संजीव कांबळे आणि उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्याकडून अहवाल मागवून घेतला. डॉ. अंदूरकर यांनी तातडीने ३२ प्रकारच्या औषधांची यादी पाठवून दिली. डॉ. जाधव यांच्याकडून पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आता वारीच्या तयारीसाठी आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, आरोग्य संचालकांच्या उपस्थितीत विशेष बैठकही आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. 

डॉ. अंदूरकर म्हणाले, पालखी मार्गावरील पंढरपूर, अकलूज, नातेपुते या रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आहे. इतर ग्रामीण रुग्णालयांमध्येही पुरेशी औषधे आहेत. वारीनंतर तुटवडा जाणवू शकतो. जिल्हा आरोग्य यंत्रणेला औषध खरेदीसाठी ठराविक अनुदान मिळते. तातडीच्या वेळी १० टक्के अनुदानातून जिल्हास्तरावर औषध खरेदी करता येते. आरोग्य उपसंचालक डॉ. देशमुख यांनी १० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन  दिले. 

पालखी मार्गावरील सर्व शासकीय रुग्णालयात आणि उपचार केंद्रांमध्ये औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांत दुर्मिळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली औषधे, साधने येण्यास उशीर होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

जिल्हा परिषदेत ठराव- आषाढी यात्रा आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. दक्षता म्हणून आरोग्य राज्यमंत्री देशमुख यांना निवेदन देण्याचा ठराव आरोग्य समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. हाफकीन जीव औषधी मंडळाऐवजी जिल्हास्तरावर औषध खरेदीला परवानगी मागण्याचा निर्णयही झाला.

राज्यभरात हीच परिस्थिती- उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय रुग्णालयांना हाफकीन जीव औषधी महामंडळातर्फे औषध पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हाफकीनकडून औषध पुरवठ्यासंदर्भात वेळेवर नियोजन होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. यातून राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचेही या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात शासनाने विशेष धोरण ठरविण्याची गरज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयhospitalहॉस्पिटल