शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक वेतन श्रेणीचे ६५ लाख गेले परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:50 IST

शिक्षक संघटनांचा आरोप,  प्रशासकीय अनुभवामुळे पुन्हा गल्लत

ठळक मुद्देप्रशासकीय अज्ञानामुळे शिक्षकांना हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागल्याचा आरोपजिल्हा परिषदेत ‘ताकही फुंकून पिणारे अधिकारी’ म्हणून संजयकुमार राठोड यांना ओळखले जाते

सोलापूर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शासनाकडून आलेले ६५ लाख रुपये मार्चअखेर नंतर परत करावे लागले आहेत. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या प्रशासकीय अज्ञानामुळे शिक्षकांना हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. तर हा निधी पुन्हा परत मिळविता येईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण संजयकुमार राठोड यांनी दिले आहे. 

शिक्षकांना १२ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वेतनवाढीचा लाभ मिळतो. १२ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षक मंडळी संस्था चालकांकडे पाठपुरावा करून प्रस्ताव तयार करून घेतात. हा प्रस्ताव वेतन अधीक्षकांकडे पाठविला जातो. यंदा वेतन अधीक्षकांनी जिल्ह्यातील ४२ शाळांतील हे प्रस्ताव शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या नजरेखाली घातले होते. जवळपास ६५ लाख रुपयांची ही रक्कम होती.

जिल्हा परिषदेत ‘ताकही फुंकून पिणारे अधिकारी’ म्हणून संजयकुमार राठोड यांना ओळखले जाते. राठोड यांनी बरेच दिवस पडताळणीच्या नावाखाली या प्रस्तावाच्या फायली लटकावून ठेवल्या. ३१ मार्चअखेर यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हे पैसे शासनाला परत करावे लागले आहेत. जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग बेकायदेशीर कामांसाठी चर्चेत असतो. प्राथमिक विभागात कायद्याचा आणि शासकीय आदेशाचा कीस पडत असल्याने वेळेवर कामे होत नसल्याची चर्चा आहे. 

वरिष्ठ वेतन श्रेणीतील प्रस्तावासाठी शिक्षणाधिकाºयांच्या प्रशासकीय मंजुरीची गरज नव्हती; मात्र शिक्षणाधिकारी अडून बसले. त्यामुळे अनेक शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. शिक्षणाधिकाºयांकडे अनेक फायली प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी शिक्षक करीत असतात. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच लक्ष घालणे गरजेचे आहे. - सुनील चव्हाण, अध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद