शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक; मोहोळच्या ४७ दूध संस्था वगळण्यासाठी याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 16:15 IST

 शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी

सोलापूर: सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मतदार यादीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली असून, न्यायमूर्ती जी.एस. पटेल व माधव जामदार यांच्यासमोर शुक्रवार दिनांक २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील राजकुमारी महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेने मोहोळ तालुक्यातील ४७ दूध संस्थांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरकतीद्वारे जिल्ह्यातील ५४ संस्थांची नावे दूध संघाच्या फेरयादीत समावेश झाली आहेत. नव्याने समावेश झालेल्या ५४ दूध संस्थांमध्ये एकट्या मोहोळ तालुक्यातील ४७ संस्था आहेत. जिल्ह्यातील अवसायनात काढलेल्या ९०४ पैकी माढा, मोहोळ, करमाळा व मंगळवेढा या तालुक्यातील जवळपास ३७५ संस्थांना सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सहकार मंत्री व सहायक निबंधक (दूध) यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. न्यायालयाने स्थगिती देताना कार्यरत संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते.

प्रारुख मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, आलेल्या हरकतीमधून मतदार यादीत समाविष्ट झालेल्या संस्था या सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिलेल्यामधील आहेत. त्यामुळे त्या ४७ संस्था मतदान यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

 

  • * दूध संघ मतदारांची २६३ दूध संस्थांची प्रारुख मतदार यादी जाहीर
  • * १०१ दूध संस्थांच्या मतदार यादीत समावेश करण्यासाठी हरकती
  • * त्यामधील ५४ संस्थांचा मतदार यादीत नव्याने समावेश
  • * ५४ मधील मोहोळ तालुक्यातील ४७ संस्थांची नावे वगळण्यासाठी याचिका
  • * मंत्र्यांच्या स्थगितीनंतर लेखापरीक्षण केल्याने वगळण्याचा प्रभावी मुद्दा

 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालयmilkदूध