शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

४० कोटींच्या थकबाकीपोटी मोहिते-पाटील ट्रस्टच्या मालमत्तेवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:05 IST

३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपयांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होतीसंस्थेच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला जमीन, इमारत, साहित्यांचा ताबा रिझर्व्ह बँक ११० कलमान्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करु शकते

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे. संस्थेच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकलूज-शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल ट्रस्टला कर्ज दिले होते. हे कर्ज या ट्रस्टने भरले नसल्याने बँकेने ३० एप्रिल १७ रोजी ३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपयांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होती. बँकेने दिलेल्या नोटीसमध्ये मुद्दल २७ कोटी व व्याज १२ कोटी अशी रक्कम ६० दिवसांत भरण्याबाबत मुदत दिली होती. या मुदतीत रक्कम भरणा केली नसल्याने सरफेशी कायदा २००२ नुसार या संस्थेने कर्जासाठी दिलेल्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. आता प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.----------------संस्थेच्या १६ पदाधिकाºयांना नोटिसासहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल चेअरमन, व्यवस्थापक व सचिव, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, शंकरराव माने-देशमुख,सुभाष पताळे, मिलिंद कुलकर्णी,भीमराव काळे, दत्तात्रय शिर्के, रावसाहेब मगर, मोहनराव लोंढे, किसनराव वाघ, केशव ताटे, अर्जुन व्यवहारे, डॉ. मनोहर इनामदार, दिनकरराव खापे आदींना बँकेने नोटीस दिली आहे. ------------------जमीन, इमारत, साहित्यांचा ताबा यशवंतनगर येथील गट नंबर ९४ बिगरशेतीमधील ३८ हजार ५०० चौ.मीटर, गट नंबर ९३/२/२ बिगरशेतीमधील ३६ हजार ४०० चौ.मी. असे ७४ हजार ९०० चौ.मीटर क्षेत्र तसेच जमिनीवरील कॉलेज इमारत, प्राचार्य, प्राध्यापक निवासी इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह असे ४ लाख चौ.फूट इमारत व त्यातील साहित्य आदींचा ताबा बँकेने घेतल्याची नोटीस बजावली आहे.--------------------रिझर्व्ह बँकेकडूनच कारवाईच्या सूचना आल्या आहेत. संचालक मंडळात मंजुरी देऊन कारवाई सुरू आहे. संचालक मंडळाने कारवाई केली नाही तर रिझर्व्ह बँक ११० कलमान्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करु शकते.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील