शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

By admin | Updated: June 23, 2017 14:26 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : २००७-०८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यापैकी १७ हजार २३ शेतकरी खातेदार पुन्हा थकबाकीदारांच्या यादीत असून त्यांच्याकडे ११३ कोटी २१ लाख ७३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही माहिती शासनाला सादर केली आहे.राज्याच्या सहकार खात्याने ही विविध प्रकारची माहिती राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना मागितली आहे. यामध्ये २००७-०८ मध्ये कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी किती शेतकरी सध्या थकीत आहेत?, याचीही माहिती मागितली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती सहकार खात्याला सादर केली आहे. मागील कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी पुन्हा त्याच शेतकऱ्यांची थकबाकी वाढली असल्याचे बँकेच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. त्याच शेतकऱ्यांची थकबाकी सर्वाधिक बार्शी तालुक्यात वाढली असून, एकट्या बार्शी तालुक्यात २९२५ शेतकऱ्यांकडे २२ कोटी २४ लाख ३ हजार रुपये थकले आहेत. पंढरपूर तालुक्यातील २४४२ शेतकऱ्यांकडे १८ कोटी ६० लाख १९ हजार रुपये पुन्हा थकले आहेत. माढा तालुक्यातील १५७९ शेतकऱ्यांकडे १४ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपये इतकी रक्कम थकीतमध्ये गेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले १८२६ शेतकरी १२ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपये थकवून कर्जमाफीच्या यादीत आले आहेत. माळशिरस तालुक्यातील १७७७ शेतकऱ्यांकडे ९ कोटी ४५ लाख २८ हजार, करमाळा तालुक्यातील १८८७ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६७ लाख २९ हजार, मंगळवेढा तालुक्यातील १३८४ शेतकऱ्यांकडे ७ कोटी एक लाख २७ हजार, सांगोला तालुक्यातील ११४३ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ६६ लाख ७० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांकडे ५ कोटी एक लाख ७० हजार, मोहोळ तालुक्यातील ८५४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ६३ लाख ९७ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांकडे चार कोटी ४४ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. -------------------२७० कोटींची कर्जमाफी.........च्२००७-०८ मध्ये शासनाने कर्जमाफी केली होती त्यावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४ हजार ३०० शेतकऱ्यांचे २७० कोटी ३७ लाख ६६ हजार रुपये इतके कर्ज माफ झाले होते. यामध्ये पंढरपूरच्या ९ हजार ४७० शेतकऱ्यांचे ७० कोटी ९१ लाख, माढ्याच्या ५१२७ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ७७ लाख, माळशिरसच्या ७३७४ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, बार्शीच्या ५ हजार १८२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, करमाळ्याच्या ५५२७ शेतकऱ्यांचे २४ कोटी २५ लाख, अक्कलकोटच्या २५३८ शेतकऱ्यांचे १७ कोटी १८ लाख, मोहोळच्या २४७६ शेतकऱ्यांचे १६ कोटी ९६ लाख, मंगळवेढ्याच्या २३३८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ५८ लाख, सांगोल्याच्या १९९४ शेतकऱ्यांचे १० कोटी ११ लाख, दक्षिणच्या ११९९ शेतकऱ्यांचे ७ कोटी ७९ लाख व उतरच्या १०७५ शेतकऱ्यांचे ८ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफ झाले होते.