शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डच्या १५ लाखांवर सोलापूर जिल्हा बँकेने सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:39 IST

सोलापूर : मोबाईल व्हॅन खरेदीमध्ये चालढकल झाल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी नाबार्डने १५ लाखांची रक्कम अन्य बँकेला वर्ग केल्याचे सांगण्यात ...

ठळक मुद्देव्हॅन खरेदीला वर्षभरात बँकेला मुहूर्तच मिळाला नसल्याने या निधीवर बँकेला पाणी सोडावे लागले मुदतवाढ दिल्यानंतरही मोबाईल व्हॅनची खरेदी न करता ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बँकेने केलीसप्टेंबर २०१७ मध्ये ही मंजुरी दिली होती. आॅगस्ट २०१८ पर्यंत बँकेने मोबाईल व्हॅन खरेदी करावयाची होती

सोलापूर: मोबाईल व्हॅन खरेदीमध्ये चालढकल झाल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी नाबार्डने १५ लाखांची रक्कम अन्य बँकेला वर्ग केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेला आता या रकमेवर पाणी सोडावे लागत आहे.

खेड्यापाड्यात बँकिंग सेवा मिळावी तसेच बँकेच्या सोईसुविधांची माहिती देण्यासाठी नाबार्डने काही जिल्हा बँकांना ‘मोबाईल व्हॅन’खरेदीसाठी निधीची तरतूद केली होती. यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५ लाख रुपये दिले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये ही मंजुरी दिली होती. आॅगस्ट २०१८ पर्यंत बँकेने मोबाईल व्हॅन खरेदी करावयाची होती.

दिलेल्या मुदतीत बँकेने व्हॅन खरेदी केली नसल्याने नाबार्डने एक महिन्याची मुदतवाढ दिली. या कालावधीतही व्हॅन खरेदीसाठी बँकेने हालचाल केली नाही. यामुळे नाबार्डने हे पैसे अन्य जिल्हा बँकेला वर्ग केले. व्हॅन खरेदीला वर्षभरात बँकेला मुहूर्तच मिळाला नसल्याने या निधीवर बँकेला पाणी सोडावे लागले. मुदतवाढ दिल्यानंतरही मोबाईल व्हॅनची खरेदी न करता ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बँकेने केली, मात्र नाबार्डने हा प्रस्ताव रद्द केला.

नाबार्डने मोबाईल व्हॅनसाठी जिल्हा बँकेला १५ लाख रुपये दिले होते. बँकेकडून व्हॅन खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निधी नाबार्डने अन्य बँकेला वर्ग केला. व्हॅनच्या माध्यमातून बँकेच्या सुविधा शाखा नसलेल्या गावातही देता आल्या असत्या.- प्रदीप झिले,व्यवस्थापक, नाबार्ड सोलापूर

नाबार्डने दिलेल्या निधीतून सुरुवातीला मोबाईल व्हॅन खरेदीवर सकारात्मक चर्चा झाली नाही. नंतर प्रचार व प्रसारासाठी ही गाडी उपयोगात येणार असल्याने तयारी झाली, मात्र नाबार्डने रद्द केल्याचे कळविले आहे. -किसन मोटे,सरव्यवस्थापक जिल्हा  मध्यवतीसहकारी बँक

एटीएमची सुविधाही..- या व्हॅनमध्ये एटीएमची सुविधा दिली जाणार होती. आठवडा बाजारात व्हॅनद्वारे बँकेच्या सुविधांबाबत माहिती देणे, ठेवी स्वीकारणे,नवीन खाते उघडण्याची सुविधा मिळणार होती. ज्या गावात शाखा नाही अशा खेड्यापाड्यात स्क्रीनद्वारे बँकिंगची माहिती देता आली असती. 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय