शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:04 IST

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोर ी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ठाणे, जि. साहेबगंज, झारखंड), नाजीर ओनीस शेख (वय ३५, रा. ...

ठळक मुद्देचौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केलेशोध घेण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल जप्त करून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. 

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.

आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ठाणे, जि. साहेबगंज, झारखंड), नाजीर ओनीस शेख (वय ३५, रा. बेगमगंज), साजन मोहबुल शेख (वय ३४, रा. बेगमगंज), सौदागर समशेर शेख (वय ३२, रा. बेगमगंज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त करुन सूचना दिल्या होत्या.

पंढरपूर आषाढी वारी बंदोबस्तात पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी हे मुंबईत असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना कळवून आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईत खंडणीविरोधी प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने वाडीबंदर येथे कोम्बिंग आॅपरेशन केले असता, त्या चौघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, टेंभुर्णी येथे बँक फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल जप्त करून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. 

यांनी केली कामगिरी- पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत, सपोनि सुनील पवार, स्थानिक गुन्हेचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, राजशेखर निंबाळे, पोलीस नाईक सूरज जाधव, पोकॉ. पांडुरंग काटेयलपल्ले, खराडे आदींनी ही कामगिरी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसBanking Sectorबँकिंग क्षेत्रThiefचोर