शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहर उत्तरमध्ये ३.९४ टक्के मतदान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:00 IST

पावसाचा बसला फटका; सर्वच पक्षांचे उमेदवार झाले निवांत

ठळक मुद्देगेल्यावेळेस म्हणजे सन २०१४ मध्ये ५६.४० टक्के मतदान झाले होतेयावेळेस ५२.४५ टक्केच मतदान नोंदले गेलेमतदानादिवशी झालेल्या पावसाचा मतदानाला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे

राजकुमार सारोळे 

सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभेपेक्षा यावेळेस ३.९४ टक्क्याने मतदानात घट झाली आहे. पिण्याच्या व पावसाच्या पाण्याच्या समस्येमुळे हा फटका बसला असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळेस म्हणजे सन २०१४ मध्ये ५६.४० टक्के मतदान झाले होते. पण यावेळेस ५२.४५ टक्केच मतदान नोंदले गेले. मतदानादिवशी झालेल्या पावसाचा मतदानाला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. शहर उत्तर मतदारसंघात पावसाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापुरात जोरात पाऊस झाला तर शेळगीनाला व इतर परिसरात पावसाचे पाणी घरात जाते. यंदा ही समस्या वारंवार उदभवली. मतदानाच्या आदल्या रात्री झालेल्या पावसाने अनेक नगरातील घरात पाणी शिरले. मतदान केंद्रेही पाण्यात होती. 

शेळगी, जुना बोरामणीनाका, मुकुंदनगर, शाहीरवस्ती, भवानीपेठ, मुरारजीपेठ या भागात ही समस्या जाणवली. त्यामुळे अनेक लोक मतदानासाठी बाहेर पडले नसल्याचे चित्र दिसून आले. त्याचबरोबर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उजनी धरण भरलेले असताना शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबतही लोकांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

या मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढविणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, बहुजन वंचित आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यात लढत झाली. देशमुख व सपाटे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. चंदनशिवे निवडणुकीचा पहिला अनुभव सांगताना म्हणाले, महापालिकेपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. १२ दिवस दररोज १0 किलोमीटर पायी प्रवास केला. अनेकांना भेटलो. लोकांच्या अपेक्षा साध्या आहेत. पाणी, रस्ता, ड्रेनेज आणि स्ट्रिटलाईट या मूलभूत गरजांच्या अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या. महिलावर्ग पोटतिडकीने समस्या मांडताना दिसले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर