शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सोलापूर बाजार समिती निवडणूक  मतदार यादीवर हरकती, एक हजाराहून अधिक शेतकरी मागताहेत मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:00 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. 

ठळक मुद्देसरकारने १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची घोषणासोलापूर बाजार समितीची प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण १५ गणांमध्ये ८० हजार ९२८ मतदारांचा समावेश आहेव्यापारी मतदारसंघातील १०६ मतदार थकबाकी असल्याने त्यांची नावे वगळावी, अशी मागणी एका शेतकºयाने केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. सरकारने १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा केली होती. आमचे नाव ८ अ उताºयावर दुसºया क्रमांकावर असले म्हणून काय झाले. आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. त्यामुळे आमच्या नावाचाही मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. सोलापूर बाजार समितीची प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण १५ गणांमध्ये ८० हजार ९२८ मतदारांचा समावेश आहे. हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने १० दिवसांची मुदत दिली होती. सोमवार शेवटचा दिवस होता. शनिवारपर्यंत ४९६ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. सोमवारी एकाच दिवशी ७९० शेतकºयांच्या हरकती दाखल झाल्या. यातही उत्तर सोलापूर तालुक्यातून सर्वाधिक हरकती दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश हरकती सामायिक खात्यावरील शेतकºयांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, या मागणीसाठी केल्या आहेत. त्याचबरोबर नाव दुरुस्ती व इतर कारणांसाठीच्या हरकतींचाही समावेश आहे. यावर उद्यापासून सुनावणी होईल. ८ मार्चपर्यंत यावर निकाल देण्यात येणार आहे. ---------------------------२१ हजार शेतकरी वंचित राहणार  - शासनाने बाजार समितीच्या निवडणुकीचा कायदा बदलताना १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देत असल्याचे जाहीर केले होते. प्रारुप मतदार यादी तयार करताना उताºयावरील किती शेतकºयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करायची, असा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले. निवडणूक प्राधिकरणाने मंत्रालयात मार्गदर्शन मागितल्यानंतर शासनाने ८ अ उताºयावर प्रथम क्रमांकांवर असलेल्या शेतकºयाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उत्तर सोलापूर आणि तहसीलदारांनी मतदार यादी तयार केली. यात उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजार शेतकºयांची नावे वगळण्यात आली. यातील १ हजारांहून अधिक शेतकºयांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. कायदा मोठा की परिपत्रक असा सवालही त्यांनी केला आहे. ------------------१०६ मतदारांवर आक्षेप- व्यापारी मतदारसंघातील १०६ मतदार थकबाकी असल्याने त्यांची नावे वगळावी, अशी मागणी एका शेतकºयाने केली आहे. यावरील निकालाकडेही लक्ष असेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती