शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

सोलापूर बाजार समिती निवडणुक - सहकारमंत्री गटाला ‘कपबशी’, महाआघाडीला ‘शिवण यंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:03 IST

सोलापूर बाजार समिती निवडणूक : चिन्ह वाटप पूर्ण, प्रचाराला सुरुवात

ठळक मुद्दे अंतिम उमेदवारांची यादी जाहीर निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८१ उमेदवार तीन प्रमुख पॅनलमध्ये लढत

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणाºया उमेदवारांसाठी चिन्ह निश्चित करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीतील उमेदवारांना शिवण यंत्र हे चिन्ह देण्यात आले. सर्वपक्षीय बाजार समिती बचाव पॅनलला नारळ चिन्ह मिळाले आहे. 

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी  जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८१ उमेदवार आहेत. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये लढत होत आहे. पॅनल प्रमुखांनी बुधवारी चिन्हांची मागणी केली होती. सहकारमंत्री देशमुख गट  आणि महाआघाडीच्या नेत्यांनी प्रथमत: कपबशी या चिन्हाला प्राधान्य दिले होते. सहकारमंत्री गटाचा अर्ज प्रथम दाखल झाला. महाआघाडीचा अर्ज पोहोचण्यास उशीर झाला. सर्वपक्षीय बाजार समिती बचाव पॅनलच्या उमेदवारांनीही दाखल केलेल्या अर्जानुसार नारळ चिन्ह देण्यात आले. 

अप्पांना ‘स्टुल’, चाकोतेंना ‘विमान’- मुस्ती गणातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणाºया माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना स्टुल हे चिन्ह मिळाले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात मैदानात उतरलेले सिद्धाराम चाकोते यांना विमान हे चिन्ह देण्यात आले आहे. इतर अपक्ष उमेदवारांना ढाल-तलवार, दूरदर्शन संच, छताचा पंखा, आॅटो रिक्षा, फावडे आदी चिन्हे देण्यात आली आहेत.

ना खर्चाचे बंधन, ना प्रशासनाचा धाक- बाजार समिती निवडणूक कायद्याने निवडणुकीची विशेष अशी आचारसंहिता जाहीर केलेली नाही. उमेदवारांवर खर्चाचे बंधन नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियमानुसार बँक खात्यातून खर्च, निवडणूक खर्चाचा तपशील आदींचेही बंधनही घालण्यात आलेले नाही. एकूणच निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाचे फारसे बंधन दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत पैैशाचा चुराडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

इटकळे, उंबरजे यांना बॅटरी टॉर्च- व्यापारी मतदारसंघातील बसवेश्वर इटकळे  आणि केदार उंबरजे हे आमचे उमेदवार असल्याचा दावा महाआघाडीने केला होता. परंतु, इटकळे आणि उंबरजे यांना बॅटरी टॉर्च हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याचे सांगण्यात आले. सिद्धाराम कोतली यांना गाजर, म. इब्राहीम मैंदर्गीकर यांना अंगठी, सिद्रामप्पा हुलसुरे यांना विमान चिन्ह मिळाले आहे. हमाल-तोलार मतदारसंघातील उमेदवारांना अंगठी, काचेचा पेला, गणक यंत्र,  इस्त्री, शिट्टी अशी विविध चिन्हे देण्यात आली            आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय