शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 11:40 IST

केंद्र शासनाने कांद्यावर प्रतिटन ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य लावल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याच्या दरात घसरण झाली. ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. 

ठळक मुद्देसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची उलाढाल राज्यात आघाडीवर ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर ४८०० वर खाली आलानिर्यातमूल्य वाढविल्याने दरात घसरण व्यापाºयांना कांदा निर्यातीसाठीचा खर्च वाढणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : केंद्र शासनाने कांद्यावर प्रतिटन ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य लावल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याच्या दरात घसरण झाली. ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची उलाढाल राज्यात आघाडीवर असते. सोलापूर बाजार समितीमधून कर्नाटक, आंध्रप्रदेश व दक्षिण भारतातील राज्यात कांदा जातो. यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. यावर्षी कांद्याची आवक वरचेवर वाढू लागली आहे. कांद्याची आवक जसजशी वाढेल तसतशी दरातही घसरण होणार परंतु निर्यातमूल्य वाढविल्याने दरात घसरण होत असल्याचे खरेदीदार व्यापाºयांकडून सांगण्यात आले. देशभरात कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज असतानाच कांदा निर्यातीवरचे मूल्य वाढविण्यात आले आहे. यामुळे व्यापाºयांना कांदा निर्यातीसाठीचा खर्च वाढणार असल्याने कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे कारण व्यापाºयांनी सांगितले.------------------------चार वर्षांनंतर दरात वाढ - सोलापूर बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला. - सोमवारी बाजार समितीमध्ये ४०५ ट्रक (४०, ५३० क्विंटल) कांदा विक्रीतून ९ कोटी ३२ लाख १९ हजारांची उलाढाल- सरासरी २३०० रुपयांचा दर कांद्याला आला- नोव्हेंबर २०१३ मध्ये एकाच दिवशी १० कोटी ५७ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.- डिसेंबर २०१३ मध्ये एकाच दिवशी ६७१ ट्रक कांद्याच्या विक्रीतून १० कोटी ८८ लाखांची उलाढाल झाली होती. -----------------डाळिंबाच्या दरात वाढ- सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या डाळिंबाला ५५ रुपयाचा दर मिळत होता. सोमवारी डाळिंबाची आवक वाढून १५ हजार कॅरेट इतकी झाली असताना दरही ७० रुपये इतका आला.  दरात वाढ झाल्याने शेतकºयांच्या हातात अधिक चार पैसे पडणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात डाळिांबचे क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढले आहे. ----------------जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र घटले- मागील दोन वर्षे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. अगोदरच पाणी कमी असताना मोठ्या कष्टाने आणलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागला होता. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी होती. यामुळे यावर्षी कांद्याची लागवडच कमी झाली आहे. यावर्षी कांदा उत्पादक व उत्पादन कमी असले तरी त्यांना अधिक पैसे मिळू लागले आहेत. -----------------चार वर्षांनंतर कांद्याची उलाढाल वाढली आहे. २०१३ नंतर कांद्याची आवक वाढली असेल परंतु दरात वाढ झाल्याने सोमवारी मोठी उलाढाल झाली. यावर्षीच्या हंगामात कांद्याची सर्वाधिक उलाढाल. - विनोद पाटीलप्र. सचिव, सोलापूर बाजार समिती़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmarket yardमार्केट यार्ड