शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur : ऊर्जा निर्मितीसोबतच एनटीपीसी आता ग्रामीण विकास साधणार, आजवर लावली पाच लाख झाडं

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 21, 2023 16:45 IST

Solapur:

- रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : ऊर्जा निर्मितीसोबतच आता एनटीपीसी पर्यावरण आणि आसपासच्या गावांची प्रगती साधण्यावर भर देणार आहे. सोलापूर एनटीपीसीमधील दोन युनिट यशस्वी करुन वीज निर्मितीत अव्वल स्थान निर्माण केल्यावर कंपनीने ही भूमिका जाहीर केली. येथील एनटीपीसी पर्यावरण संरक्षण आणि राखेच्या वापरासाठी अत्यंत जबाबदारीने काम करत आहे. जास्तीत जास्त झाडे लावून प्रकल्प परिसर आणि परिसर हिरवागार आणि स्वच्छ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

आजवर ४ लाख ९७ हजार झाडं लावण्यात आली असून, पैकी ५० हजार झाडे वर्षभरात लावण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात राखेचा सर्वोच्च महसूल आणि १०० टक्के सर्वोत्तम वापराचा टप्पा ओलांडला आहे. फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी आणि तिल्हेहाळ या गावांमध्ये विकासही साधून एनटीपीसीने ग्रामस्थांना आपलेशे करुन घेतले आहे. पाण्याच्या टाक्या, रस्ते, शौचालयं, सोलर हाय मास्ट, बस निवारा, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, शाळा/पोलिस स्टेशनसाठी संरक्षक भिंती आदी कामांमुळे एनटीपीसी कंपनीने सामाजिक कार्यात आघाडी घेतली आहे. शेतकरी, महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शेतकरी, प्रकल्पग्रस्त गावांमध्ये महिला बचत गटांसाठी गारमेंट युनिटची स्थापना आणि बरेच काही स्टेशनद्वारे पुरविले जात आहे. महिला बचत गटांसाठी मास्क शिलाई युनिट,गारमेंट युनिट आणि शिलाई मशीन साहित्याचा पुरवठाही केला आहे. गावांतील मुलींना बळकट करण्यासाठी बालिका सक्षमीकरण अभियान मोहीमही हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर