शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापुरात आंदोलनकर्त्यांनी केली धुळीने आंघोळ; आम आदमी पक्षाचे महापालिकेत अनोखे आंदोलन

By appasaheb.patil | Updated: March 16, 2023 15:47 IST

Solapur: आम आदमी पक्षाने शुक्रवारी सकाळी महापालिकेत अनोखे आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी धुळीने आंघोळ केली.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : शहरात वाढत असलेल्या धुळीमुळे लोकांना त्रास होत आहे. आरोग्याच्या विविध समस्या जाणवत आहेत. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आम आदमी पक्षाने शुक्रवारी सकाळी महापालिकेत अनोखे आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी धुळीने आंघोळ केली. यावेळी विविध घोषणा देत आंदोलनकर्ते महापालिकेत सर्वांचे लक्ष वेधले.

शहरात ड्रेनेज लाईनची कामे मोठया प्रमाणात सुरू आहेत. रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट पध्दतीने करण्यात येत आहेत. याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. जनतेला त्रास देण्याचे काम महापालिका प्रशासन करतेय. वाढत्या धुळीमुळं फुफ्फुस, कर्करोगासारखं गंभीर आजार होत आहेत. वारंवार पत्र, निवेदन, तक्रार, चर्चा करूनही महापालिका सातत्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. जाणीवपूर्वक सोलापूरकरांना त्रास देण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. धुळीने आंघोळ करून महापालिकेचे लक्ष वेधले आहे. धुळ कमी न झाल्यास आज आम्ही धुळीने आंघोळ केली आहे, उद्या गरज पडली तर तुम्हालाही धुळीने आंघोळ घालू असा इशाराही आम आदमी पक्षाने दिला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरAAPआप