शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

केळी अन् कलिंगडच्या मार्केटिंगसाठी घेतला सोशल मिडियाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:48 IST

अभियंता बनला शेतकरी; लॉकडाऊनमुळे पुणे सोडले; केळीत लावलेल्या कलिंगडांचं सहा लाख उत्पन्न मिळविले...!

मोहन डावरे 

पटवर्धन कुरोली : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. अनेकजण नवीन नोकरी, व्यवसायाच्या शोधात आहेत. तर काहीजणांनी स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले आहे; मात्र पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे संजय मगर या अभियंत्याने लॉकडाऊनमुळे पुणे सोडले. गावात येऊन विचार करत न बसता केळीच्या पिकात आव्हान म्हणून कलिंगडाचे आंतरपीक घेतले आणि पाचएकरात तब्बल ६ लाखांचे उत्पन्न मिळविले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावात आलेले काही तरूण पुढे काय होणार, या विचारात राहिले. मात्र संजय मगर यांनी गावाकडे आल्यानंतर केळीच्या बागेत पाच एकर कलिंगड लावण्याचे ठरविले. त्यानुसार ठराविक अंतरावर दोन केळीच्या खुटामध्ये कलिंगडाची लागवड केली. कलिंगडाची लागवड करताना त्यांना केळी व्यतिरिक्त एकरी ६० हजार रूपयांचा खर्च आला, असे एकूण ५ एकराचे तीन लाख रूपये खर्च आला.

कलिंगडाचे पीक अवघ्या तीन महिन्यात काढणीस आले. मध्यंतरी उन्हाळ्याच्या प्रारंभी कलिंगडाची आवक जास्त असल्याने दर कोसळले होते. यानंतर मात्र रमजान सुरू झाला. संजय मगर यांच्या कलिंगडाला सरासरी किलोमागे  ५ रूपयांपासून ९ रूपयांपर्यंत दर मिळाला. तरीही ५ एकरामध्ये तब्बल १५० टनापेक्षा जास्त उत्पादन मिळाल्याने त्यांना तब्बल ६ लाख रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. मशागत व लागवडीचा खर्च वजा जाता त्यांना ३ लाख रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या कलिंगड उत्पादनात पुणेस्थित असलेली आपले कुटुंब व परिवारातील लोकांनीही सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

ये-जा करणाºयांसाठी कलिंगडाचा प्लॉट खुला- कलिंगडाची तोडणी सुरू झाल्यानंतर अभियंता असलेल्या संजय मगर यांनी व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, दूरध्वनीद्वारे या कलिंगड प्लॉटची जाहिरात केली. प्रत्येकाला फोन करून कलिंगड खाण्यासाठी येण्याचे आवाहन केल्याने पटवर्धन कुरोली, शेवते, नांदोरे, देवडे, पिराची कुरोलीसह इतर गावात असलेले मित्र, सगेसोयरे, वाटसरू यांच्यासाठी पूर्ण महिनाभर कलिंगडाचा प्लॉट खाण्यासाठी खुला केला होता. कलिंगड खाण्यासाठी येणारा घरी नेण्यासाठीही मोफत देण्यात येत होते. यानंतरही कलिंगडाचे मोठे उत्पन्न मिळाले आहे. या अभियंता शेतकºयाचे कौतुक होत आहे.