शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

इंटरनेटच्या दुनियेतील सामाजिक आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:21 IST

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहासोबत डिजिटलायझेशनचे वारे वेगाने आपल्या सभोवताली घोंगावू लागले. याचा परिणाम समाज, व्यवहार आणि अनेक सामाजिक संदर्भ बदलण्यात ...

ठळक मुद्देअमेरिकेत हेच प्रमाण ३०० मिनिटांपर्यंत आढळून आले आहे.इंटरनेटचा ४० टक्के वापर सोशल मीडियासाठी केला जातोप्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर करण्यावर उपभोक्त्यांचा कल

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहासोबत डिजिटलायझेशनचे वारे वेगाने आपल्या सभोवताली घोंगावू लागले. याचा परिणाम समाज, व्यवहार आणि अनेक सामाजिक संदर्भ बदलण्यात झाला. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील अनेक राष्ट्रे एकमेकांशी जोडली गेली, संदेशवहनामध्ये आमूलाग्र बदल झाले. कुठलाही समाज अथवा समुदाय जीवन सुखकर करण्यासाठी विविध साधनांची निर्मिती व स्वीकार करतो. तथापि, हीच साधने समाजाची ओळख नव्याने लिहितात. कोणे एकेकाळी पोस्टमनची आतूरतेने वाट पाहणारा समाज वायरलेस उपकरणाचा नकळत उपभोक्ता झाला. इतकेच नव्हे तर इंटरनेट मानवी जीवनातील खासगी आणि व्यावसायिक अशा प्रत्येक कृतीचा अविभाज्य भाग झाले. 

भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत खूप वरच्या स्थानी आहे. सध्या इंटरनेटचा वापर करण्याºया ग्राहकांची भारतातील संख्या अंदाजे ५०० मिलियनच्या घरात पोहोचली आहे. ‘इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन आॅफ इंडिया’ या संघटनेकडून नुकताच एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार डिसेंबर २०१७ मध्ये भारतात ४८१ मिलियन भारतीय इंटरनेटचे उपभोक्ते होते.

२०१६ च्या तुलनेत ही संख्या ११.३४ टक्क्यांनी वाढली. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत चीनपाठोपाठ भारत देश इंटरनेटच्या माध्यमातून दुसरी सर्वात मोठी आॅनलाइन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या अहवालातील निष्कर्षानुसार २०२१ सालापर्यंत भारतातील इंटरनेटचा वापर करणारी लोकसंख्या अंदाजे ६३५.८ मिलियनच्या घरात असेल. तथापि, स्त्री-पुरुषांमधील समतेची दरी आणि त्याचे वास्तव इंटरनेटच्या वापरात देखील भारतात दिसून येते. सर्वेक्षणानुसार जवळपास २९ टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात तर ७१ टक्के भारतीय पुरुष इंटरनेटचा वापर करतात.

यावरून दोघांमधील तफावत ठळकपणे दिसून येते. भारतात २०२० साली जवळपास ४० टक्के महिला तर ६० टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतील, असा अंदाज मांडला गेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून स्त्री-पुरुष दरी ठळकपणे अधोरेखित होत असतानाच दुसरी मोठी दरी नजरेआड करता येत नाही. भारतात शहरी भागात साधारणत: ६८-६९ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात तर ग्रामीण भागात फक्त २३-२५ टक्के लोकांच्या वापरात इंटरनेट आहे. डिजिटलायझेशनच्या मोहिमेपुढील हे फार मोठे आव्हान मानले गेले आहे. कारण, भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण शहरी लोकसंख्येच्या मानाने खूप मोठे आहे. असे असताना देशातील अधिकाधिक लोकसंख्या इंटरनेटच्या कक्षेत नसणे, यामुळे अनेक पातळीवर पीछेहाट नाकारता येत नाही. 

एकीकडे लिंग आधारित इंटरनेट वापर दरी, शहरी-ग्रामीण दरी असे चित्र असताना वयोगटानुसार इंटरनेटचा होणारा वापर भुवया उंचवायला लावतो व अनेक आव्हानांची जाणीव करून देतो. सर्वेक्षणानुसार इंटरनेट उपभोक्त्यांच्या लोकसंख्येच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या महाविद्यालयीन तरुण विद्यार्थी आणि शाळकरी विद्यार्थी असून, ते इंटरनेटचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात. त्या खालोखाल २६ टक्के युवक इंटरनेट वापरतात. म्हणजे भारतातील तरुणाईचे सर्वात आवडते आणि अप्रूप मनोरंजनाचे (?) साधन कुठले हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता भासत नाही. 

भारतातील इंटरनेटच्या वापराबाबत अनेक निष्कर्ष उत्सुकता वाढवितात. कारण, इंटरनेटकडे माहितीचे मायाजाल म्हणून पाहणारा मोठा वर्ग समाजात आहे. ज्ञानाचे स्रोत म्हणून सर्च इंजिनची अहोरात्र मदत घेतली जात असताना आश्चर्यकारकपणे इंटरनेटच्या एकूण उपयोगापैकी सर्वाधिक उपयोग म्हणजेच ४० टक्के वापर सोशल मीडिया, ३० टक्के मनोरंजन आणि राहिलेला ३० टक्के वापर इतर सर्व कार्यांसाठी केला जातो. असे आढळून आले आहे की, भारतात सर्वसाधारणपणे प्रतिदिन २०० मिनिटे व्यक्तीची इंटरनेटच्या संपर्कात जातात.

अमेरिकेत हेच प्रमाण ३०० मिनिटांपर्यंत आढळून आले आहे. इंटरनेटचा ४० टक्के वापर सोशल मीडियासाठी केला जातो. यावरून भारतीयांचे सोशल मीडियावरील प्रेम आणि त्याबाबतची जागरुकता अधोरेखित होते. केवळ एवढेच नाही तर अलीकडील काळात इंटरनेटवर इंग्रजी भाषेतून माहितीचा शोध घेण्यापेक्षा प्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर करण्यावर उपभोक्त्यांचा कल असल्याचे गुगलसारख्या मोठ्या कंपनीने देखील मान्य केले आणि अधिकाधिक माहिती प्रादेशिक भाषेतून उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा कामास लागली. 

मात्र, महाविद्यालयीन तरुण आणि शाळकरी मुले इंटरनेट अधिकाधिक वापरणे आणि एकूण वापरात मनोरंजनासाठी इंटरनेटचा अधिक वापर असणे अशा निरीक्षणातून भविष्यकाळातील पालकत्वाची आव्हाने आणि त्याची व्याप्ती व गुंतागुंत वाढणार असल्याचे सूतोवाच होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जादूई दुनियेत केवळ सोशल मीडिया व मनोरंजन इथपर्यंत मर्यादित न राहता इंटरनेटचा विधायक उपयोग कसा करता येईल. त्याचसोबत भविष्यकाळात विज्ञानाधारित सुसंस्कारित पिढी उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी करणे हे आव्हान सक्षमपणे झेपल्यास इंटरनेटचा उपयोग नवसमाज निर्मितीसाठी होईल, असे म्हणता येईल.- डॉ. दीपक ननवरे(लेखक दयानंद वाणिज्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरInternetइंटरनेट