शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

तर कोरोनापेक्षा कुपोषणाने जास्त बळी पडतील; मेधा पाटकारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:19 PM

सोलापूर शहरातील श्रमिकांशी साधला संवाद; रेशन धान्य व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही - मेधा पाटकरसरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे - मेधा पाटकरप्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी - मेधा पाटकर

सोलापूर : देशातील रेशन व्यवस्थेत सुधारणा करावी. पाच किलोऐवजी १५ किलो धान्य देण्यात यावे. या सुधारणा न झाल्यास गरीब लोक हे कोरोनाने नाही तर कुपोषणाने मरतील, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.

लॉकडाऊनमध्ये शहरात उद्भवलेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मेधा पाटकर या सोलापुरात आल्या होत्या. शहरातील विविध वसाहतींमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच शिक्षण, आरोग्य, मागासवर्गीय, महिला, कामगार, देवदासी, घरगुती कामगार यांच्या प्रश्नांवर काम करणाºया कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

मेधा पाटकर म्हणाल्या, सोलापुरातील अनेक महिलांशी संवाद साधल्यानंतर येथील रेशन व्यवस्थेत अफरातफर असल्याचे समजले. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पाच किलो धान्य देण्याची घोषणा झाली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांना मे आणि जूनमध्ये धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष हे धान्य सर्वांना मिळाले नाही. आॅनलाईनच्या नावाखाली भ्रष्टाचार होत आहे. त्यांची नावे आणि नंबर देखील आम्हाला मिळाले आहेत.

महिलांना देखील मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांच्या खात्यामध्ये जनधन योजनेंतर्गत पैसे आले नाहीत. घरगुती काम करणाºया महिलांना भेटल्यानंतर त्यांच्याही समस्या समजल्या. त्यांना घरात घेतले जात नाही. बहुतांश मालक हे मोलकरणींना लॉकडाऊनदरम्यानचे वेतन देत नाहीत. हीच स्थिती नाभिक समाजाचीही आहे. ज्यांना एड्स आणि चिकन गुनिया असताना लक्ष्य बनवले होते, त्यांनाच पुन्हा का लक्ष्य बनवले जात आहे, हा आमचा सवाल आहे. हॉटेल सुरू आहेत. 

विमाने सुरू केली आहेत तर नाभिक समाजाच्या कारागिरांना किट्स देऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली. जुना विजापूर नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मेधा पाटकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे, यशवंत फडतरे, सुजाता फडतरे, दीपक आठवले, नागीणताई साबळे, दीपक गायगवळी, गिरीश उडाणशिव, बिस्मिल्ला मुजावर, जयदेवी शिवशरण, केवल फडतरे, सचिन कोलते आदी उपस्थित होते.

केंद्राकडून फंड घेण्यासाठी राज्य सरकारने लढा उभा करावा- आमचे म्हणणे हे आहे की, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कुठलेच सरकार करणार नाही. पण राज्य सरकारला केंद्राने फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राज्याने यासाठी लढा उभारला पाहिजे. नाही तर संघात्मक रचनेला काही अर्थ नाही. त्या फंडातून रोजगार हरवून बसलेल्या किंवा ठप्प असलेल्या प्रत्येक बेरोजगार आणि अर्धरोजगारालासुद्धा १० हजार रुपये तत्काळ बँकेत देऊन क्रयशक्ती निर्माण करायला हवी. नाही तर दुकाने उघडी राहतील, पण ग्राहक येणार नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedha Patkarमेधा पाटकरfoodअन्न