शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:43 IST

वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.

ठळक मुद्देसोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात चार बिबटे आहेत. त्यात नर आणि मादी प्रत्येकी दोन आहेत वन्यजीवांना सध्याच्या ४२ अंशांवर पोहोचलेल्या उष्मांकाच्या दिवसात माणुसकीची झुळूक अनुभवास येत आहे

गोपालकृष्ण मांडवकर 

सोलापूर : महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात असलेल्या वन्यजीवांना सध्याच्या ४२ अंशांवर पोहोचलेल्या उष्मांकाच्या दिवसात माणुसकीची झुळूक अनुभवास येत आहे. वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे.

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात चार बिबटे आहेत. त्यात नर आणि मादी प्रत्येकी दोन आहेत. २०१४ मध्ये त्यांच्यासाठी या बागेत मजबूत कठडे आणि पिंजरे उभारण्यात आले. या चारही पिंजºयांवर शहाळ्या टाकून छत तयार करण्यात आले आहे. सभोवती असलेल्या झाडांमुळे येथील तापमान बरेच कमी जाणवते. तरीही त्यांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी चार वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत. ते दिवसभर सुरू असतात. यासोबतच खुल्या आणि बंद पिंजºयांमध्ये पाईपने पाणी मारून वातावरणात गारवा राखण्याचा प्रयत्न केला जातो.  या बिबट्यांच्या सेवेसाठी चार कर्मचारी तैनात असून, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आहार, आरोग्याची नियमित देखभाल केली जाते. 

बलराम आहे नरभक्षक- या उद्यानात असलेल्या चारही बिबट्यांपैकी ‘बलराम ’ नाव असलेला नरभक्षी आहे. यापूर्वी त्याने तीन जणांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे असून, त्याला उत्तर प्रदेशातून पकडल्यानंतर येथील उद्यानात ठेवण्यात आले आहे. अन्य तीन बिबट्यांच्या तुलनेत आक्रमक आणि अधिक हिंस्र असलेला ‘बलराम’ पाच वर्षांचा आहे. त्याच्या बंदिस्त पिंजºयाजवळ जाताना उद्यानातील केअरटेकरलाही बरीच दक्षता घ्यावी लागते.

तिघे अखिलेशकुमार यादव यांच्याकडील बछडे- बलरामव्यतिरिक्त तीन बिबटे येथे आहेत. त्यापैकी एकाचे नाव राजू ठेवण्यात आले असून, अन्य दोन माद्यांची नावे जिमी आणि हिना अशी आहेत. २०१४ मध्ये अखिलेशकुमार यादव यांच्या खासगी उद्यानातून त्यांना येथे वनविभागाने आणले. तेव्हा ते बछडे होते. आता विकसित झाले आहेत. हे तिघेही साडेचार वर्षांचे आहेत.

उद्यानातील चारही बिबट्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिंजºयांसमोर कुलर लावण्याचा निर्णय घेतला. त्यात नियमितपणे पाणी भरले जाते. पुढच्या तीव्र उन्हाच्या दोन महिन्यांत याचा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. यासोबतच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही केली जाते. - डॉ. नितीन गोटेसंचालक, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघWaterपाणीTemperatureतापमान