शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या तापमानात किंचित घट ; रविवारपासून पावसाची शक्यता 

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 6, 2024 19:52 IST

रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सोलापूर : सतत वाढत जाणाऱ्या तापमानात शनिवार ६ एप्रिल रोजी किंचित घट झाली. शुक्रवारच्या तुलनेने शनिवारी ०.७ अंशाने तापमान घटले. तापमानात घट झाली असली तरी धग मात्र कायम आहे. हवामान विभागाने रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सोलापूरच्या तापमानात शुक्रवार ५ एप्रिल रोजी विक्रमी वाढ झाली. शुक्रवारी तापमान हे ४३.१ अंश सेल्सिअस इतके होते. यंदाच्या वर्षीच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात ०.७ अंश सेल्सिअसने तापमानाच घट झाली. ही घट किंचित असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होताना दिसत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहे . त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे उन्हात काही काळ जरी बाहेर पडल्यास डोकेदुखी सारख्या समस्यांना सोलापूरकरांना तोंड द्यावे लागत आहे. वाढते तापमान पाहून शहरातील अनेक दुकानात एसी, कूलर, पंख्यांची मागणी वाढत आहे. तर शहरातील भाजी मंडईमधून कलिंगड, टरबूज आदी फळे खरेदी केली जात आहेत. शहरातील सर्व मंडईमध्ये फळे घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ७ ते ११ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस ?सोलापूरचे तापमान सध्या वाढत असले तरी पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ७ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. या दरम्यान वीजेचा कडकडाट व अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अवकाळी पाऊस आल्यास तापमानात घट होऊ शकते. उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर