शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सहाशे सभासदांच्या गठ्ठ्याने सत्ताधाºयांना पाचव्यांदा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 16:05 IST

पद्मशाली शिक्षण संस्था निवडणुक विश्लेषण; विधानसभेला विरोध होईल म्हणून महेश कोठे यांनी तटस्थ राहणे केले पसंत

ठळक मुद्देविधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोठे यांनी गोप यांना विरोध केला असता तर गोप यांनी निवडणुकीत कोठे यांना जोरदार विरोध केला असता.गेल्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या निवडणुकीत कोठे यांच्या अध्यक्षपदाचा विरोध करण्यासाठी दशरथ गोप, सुरेश फलमारी, आनंद इंदापुरे यांच्यासह  इतर विश्वस्तांनी जोरदार पुढाकार घेतला होता.

महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गेल्या चार टर्मपासून सत्तेत असणारे दशरथ गोप आणि त्यांच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पाचव्यांदा कौल मिळाला आहे. गोप यांनी सभासद करून घेतलेल्या ६०० मतदारांनी पुन्हा त्यांना तारले आहे.  समाजातील वरिष्ठांनीही उघड विरोध टाळल्यामुळे परिवर्तन झालेच नाही. गोप यांच्या विरोधात निवडणुकीआधीच वातावरण निर्माण करणाºया महेश कोठे यांनी भविष्यातील विधानसभेला विरोध नको म्हणून तटस्थ राहणे पसंत केले.

गेल्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या निवडणुकीत कोठे यांच्या अध्यक्षपदाचा विरोध करण्यासाठी दशरथ गोप, सुरेश फलमारी, आनंद इंदापुरे यांच्यासह  इतर विश्वस्तांनी जोरदार पुढाकार घेतला होता. गोप विरुद्ध कोठे वाद विकोपाला गेला होता. हा हिशोब चुकता करण्यासाठी कोठे यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. 

गोप यांना विरोध करणारे कोठेंच्याबरोबर गेले. दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत वाद होऊन युती मोडली होती. यामुळे कोठे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली आणि हीच युती विधानसभेलाही होणार असल्यामुळे कोठे यांच्या आमदार होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. नेमकी हीच गोष्ट गोप यांच्या पथ्यावर पडली.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोठे यांनी गोप यांना विरोध केला असता तर गोप यांनी निवडणुकीत कोठे यांना जोरदार विरोध केला असता. बहुसंख्य तेलुगू भाषिक मतदार हा भाजपला मानणारा आहे. भाजप-शिवसेनेची युती असल्यामुळे हे मतदान आपसुकच आपल्याकडे येईल, हा अंदाज बांधून मतांचे विभाजन टाळण्यासाठी महेश कोठे तटस्थ राहिले.

ज्ञाती संस्थेच्या वादावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गोप यांच्या विरुद्ध पॅनल उभे करणार अशी  घोषणा कोठे यांनी केली होती. या घोषणेमुळे गोप यांना विरोध करणारे कोठेंच्याबरोबर आले होते. त्यांनी यांना काहीही करा, गोप यांच्याविरोधात पॅनल उभे करा, अशी मागणी कोठेंकडे केली होती. कोठेंनी मध्यस्थीचा प्रयत्न केला खरा पण येणाºया विधानसभेचा विचार करून तटस्थ राहणे पसंत केले.

गोप ठरले किंगमेकर- कोठे यांनी समझोत्याचे प्रयत्न सुरू केले. समाजातील ज्येष्ठ आणि उच्चशिक्षित लोकांना एकत्र करून निवडणुकीआधीच गोप यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना गोप यांच्या गटाने खो घातल्यामुळे निवडणूक लागली. कोठे यांचे विश्वासू सहकारी जनार्दन कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्यात आले. कारमपुरी यांच्यामुळे काही प्रमाणात निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र  ६०० सभासदांच्या जीवावर गोप पुन्हा एक किंग आणि किंगमेकर असे दोन्ही ठरले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर