शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सहा महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील ११५७ वीजचोरांवर झाली कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 5, 2020 11:55 IST

महावितरण; तारेवर आकडा टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे, पट्टी टाकणे पडले महागात

ठळक मुद्देवीजचोरी रोखण्यासाठी सोलापूर मंडलात भरारी पथके तयार करण्यात आली पथकाच्या माध्यमातून वीजचोºया उघडकीस आणण्यात येत आहेत कमी वीज बिल आकारण्यासाठी अनेक ग्राहकांकडून मीटरमध्ये फेरफार

सोलापूर : मीटरमध्ये फेरफार करणे, पट्टी टाकणे, तारेवर आकडा टाकून वीज वापरणाºया वीजचोरांना महावितरणने चांगलाच शॉक दिला आहे़ मागील सहा महिन्यांच्या कालावधीत महावितरणने ११५७ वीज ग्राहकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, वीज चोरीप्रकरणी २४ वीजचोरांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.

महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात वीजचोरांवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू आहे़ त्यासाठी महावितरणने खास पथके तयार केली आहेत़ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणताना वीजचोरीची बहुतांश प्रकरणे ही वीज मीटरमध्ये फेरफार करणारी असल्याची आढळून आली. कमी वीज बिल आकारण्यासाठी अनेक ग्राहकांकडून मीटरमध्ये फेरफार करण्यात येतो. यासाठी लोहचुंबक वापरण्यापासून वीजपुरवठा करणाºया तारांमध्ये बदल करण्यापर्यंतच्या क्लृप्त्या लढविण्यात येतात. यामुळे नेहमीपेक्षा कमी वीज बिल येते. ही फसवणुकीची प्रकरणे अधिक प्रमाणात आढळून येतात. 

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक वीजचोरी ही अकलूज विभागातील अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाºया गावांमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी शहर उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाºया गावांमध्येही चोरीचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, सोलापूर शहरात वीजचोरीचे प्रमाण कमी असल्याचे महावितरणने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे़ 

२४ वीजचोरांवर झाला गुन्हा दाखल- एखाद्या महावितरणच्या अधिकाºयाने वीजचोरी पकडली तर संबंधित वीज ग्राहकाला दंड केला जातो़ तसेच यापुढे वीजचोरी करू नये, याबाबत तंबी दिली जाते़ जर संबंधित वीज ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत दंड भरला नाही तर त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते़ असेच दंड न भरलेल्या २४ वीजचोरांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ मधील तरतुदीनुसार सोलापूर मंडल विभागातील अधिकाºयांनी गुन्हा दाखल केला आहे़ 

वीजचोरी रोखण्यासाठी सोलापूर मंडलात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकाच्या माध्यमातून वीजचोºया उघडकीस आणण्यात येत आहेत़ संबंधितांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे़ कोणत्याही वीज ग्राहकाने वीजचोरी करू नये़ महावितरणच्या सर्वच योजनांचा लाभ घ्यावा़- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल

अशी आहे वीजचोरांची आकडेवारी...विभाग    तपासणी    वीजचोर

  • अकलूज    २६१०    ५८५
  • बार्शी    १४७    ५९
  • पंढरपूर    ७१८    ८९
  • सोलापूर ग्रामीण    २८६    २४९
  • सोलापूर शहर    २२    ०७
  • एकूण    ३७८३    ११५७
टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण