शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा नदीवरील घाट कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 09:23 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाटा नजिक नव्याने बांधण्यात आलेला घाट सहा जणांच्या अंगावर कोसळला. यामुळे दगड माती खाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत असलेल्या घाटाच्या कामाच्या ठेकेदार विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदी लगत कुंभार घाट येथे घाट निर्मितीचा ठेका ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांनी घेतला आहे.  त्या कामावर  सुदीप गोपाल चमारिया (वय २०, रा. १०३ समृध्दी हेरिटेज जुळे, सोलापूर) व साक्षीदार हे देखरेख करत होते. 

त्यावेळी त्यांनी ठेकेदार अशोक भागवत इंगोले  यांना घाट भिंतीचे उंची जास्त असलेने त्यांना आवश्यक सुरक्षा कठडे ,दर्शक फलक बोर्ड ,रेलिंग ग्रील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत व उर्वरित राहिलेले बांधकाम पूर्ण करणे  बाबत लेखी व तोंडी सूचना देऊन ही त्यांनी त्यात हलगर्जीपणा केला आहे.

मंगेश गोपाळ अभंगराव (वय ३०), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०), राधा गोपाळ अभंगराव (वय ६०, तिघे रा कुंभार घाट, पंढरपूर), संग्राम उमेश जगताप (वय १४ रा भडीशेगाव ता.पंढरपुर) व दोन अनोळखी महिला (वय अंदाजे ५५ ते ६०)यांच्या अंगावर घाट बांधकामाची भराव केलेले दगडे, चुना, माती, वाळू कोसळले. त्याखाली दबून त्यांचे सर्वांचे मृत्यू झाला. तसेच घाट बांधकामाचे नुकसानीस कारणीभूत झाले. म्हणून ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांच्याविरुद्ध भा.द.वि.क ३०४ (अ) ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शिवाजी करे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी