शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे प्रवाशांकडून होणार ‘युजर चार्ज’ वसूल

By appasaheb.patil | Updated: September 19, 2020 18:12 IST

रेल्वे विभागाने जारी केली सूची : देशातील वर्दळीच्या हजार स्थानकाच्या यादीत सोलापूरचा समावेश

सोलापूर : विमानतळाप्रमाणेच आता रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांकडून ‘युजर चार्ज’ वसूल करण्यात येणार आहे़ रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या जास्त गर्दीच्या व महत्त्वाच्या १ हजार रेल्वे स्थानकाच्या यादीत सोलापूर रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे आता सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाºया प्रवाशांना तिकिटासाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे़

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ या लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती़ लॉकडाऊन काळात मालवाहतूक, किसान रेल, पार्सल सेवेच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्नही कमी  मिळाले़ त्यामुळे रेल्वेच्या एकूण उत्पन्नात या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली़ त्यामुळे विमानतळाप्रमाणे आता यापुढे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेतून करण्यात येणारी कामे युजर चार्र्जेसमधून आलेल्या पैशातून करण्याचे नियोजन सुरू आहे़ त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ज्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या अधिक आहे त्या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांकडून युजर चार्र्ज वसूल करण्यात येणार आहे़ -------------काय आहे युजर चार्ज़...भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जातो़ तसेच विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात़ त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी दिला जातो; मात्र यापुढे रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे युजर चार्जेसमधून मिळालेल्या पैशातून करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार सुरू आहे़ त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाºया प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटामागे एक ठराविक रक्कम युजर चार्जेस म्हणून वसूल करण्यात येणार आहे़ ही रक्कम काही पैसे किंवा रुपयात असणार आहे़ --------------यामुळे आले सोलापूरचे नाव...देशातील १५ टक्के रेल्वे स्टेशनवर युजर चार्ज आकारला जाणार आहे़ अगोदर ए-१ आणि ए श्रेणीच्या मोठ्या स्टेशनला युजर चार्ज लागू करण्यात येईल. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून कमाईच्या हिशोबानं स्टेशनची ‘श्रेणी’ निश्चित करण्यात आली आहे़ देशात सर्वाधिक कमाई करणारे ‘ए-१ श्रेणी’चे ७५ स्टेशन आहेत. यात सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे़ सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज ९८ रेल्वे गाड्या धावतात, त्यातून साधारणपणे ४ ते ५ हजार प्रवासी प्रवास करतात़ 

सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रत्येक प्रवाशांकडून युजर चार्ज वसूल करण्याबाबत अद्याप सोलापूर विभागाला कोणत्याही प्रकारचा निरोप, पत्र प्राप्त झाले नाही़ त्यामुळे आताच यावर बोलणे योग्य नाही़ - प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर विभाग.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAirportविमानतळ