शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सोलापूरातील सिद्धेश्वर साखर कारखाना हमाल वस्तीत आग, दहा घरे जळून खाक,

By admin | Updated: April 18, 2017 18:23 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : कुमठे येथील सिध्देश्वर साखर कारखान्याच्या हमाल वस्तीला आग लागून बांबू व पत्र्यांचे शेडची दहा घरे जळून खाक झाले. यात मजुरांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. ही घटना सोमवारी रात्री घडली. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. सिध्देश्वर साखर कारखान्याने हमालांना राहण्यासाठी पत्र्यांचे शेड तयार केले आहे. या पत्र्यांच्या शेडला सोमवारी रात्री अचानक आग लागली. त्यावेळी कामगारांनी व इतर लोकांनी मिळून पत्र्यांच्या शेडमधील संसारोपयोगी साहित्य तत्काळ बाहेर काढले. मात्र काही पत्राशेडमधील गहू, ज्वारी, तांदूळ, कपडे अशा प्रकाराचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्या पत्र्यांच्या शेडमधील काही कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. मात्र सध्या गाळप हंगाम नसल्याने तिथे कोणी राहत नव्हते, मात्र त्यांचे संसारोपयोगी साहित्य होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील काही पत्र्यांच्या शेडला आग लागली नाही. या घटनेमध्ये संसारोपयोगी साहित्य जळाले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर एका कामगाराच्या घरातील काही रोकड जळून खाक झाल्याचे तेथील महिलेने सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कारखान्याचे शिवशकंर बिराजदार, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्यासह आदींनी भेट दिली. ---------------------------संसारोपयोगी साहित्य रस्त्यावरकारखान्याच्या हमाल वस्तीला आग लागल्यानंतर काही जणांनी संसारोपयोगी साहित्य घराबाहेर काढून रस्त्यावर टाकले. यात काही जणांच्या सामानांचे थोड्या फार प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही जणांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचे कामगारांनी सांगितले. आग लागल्यानंतर तेथील बांबूच्या शेडची घरे काढून त्या ठिकाणी पत्र्यांचे किंवा नवीन घरे बांधून देणार असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगितले.---------------------------कारखाना नुकसानभरपाई देणारहमाल वस्तीला आग लागून दहा घरे जळाली आहेत. यात संबंधित कामगारांना नुकसानभरपाई कारखान्याच्या वतीने देणार असल्याचे कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुंभार यांनी सांगितले. तसेच कामगारांना जेवणाची व रात्री राहण्याची व्यवस्था कारखान्याच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.------------------फायर ब्रिगेडला सिग्नलचा अडथळासावरकर मैदानावरून गाडी होटगीच्या दिशेने निघाली, मात्र गांधीनगर सिग्नलला ही गाडी अडकली. वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी समयसुचकता दाखवून गाडीला रस्ता काढून दिला. ही गाडी तसेच पुढे आल्यावर महावीर चौकात रेड सिग्नल होता. आसरा चौकातही अशीच परिस्थिती होती.सिग्नल सुटल्यावरच गाडीने वाट काढत सिध्देश्वर साखर कारखाना गाठला.-----------------अग्निशामक यंत्रणेची गरज२० वर्षापूर्वी या परिसरात अशाच प्रकारे आग लागली होती. यात पाळण्यातील एका लहान मुलाला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा बसवण्याची आवश्यकता होती. ती असती तर ही दुर्घटना टळली असती, अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. आग लागताच आरडाओरड झाल्याने वस्तीतील लोक तातडीने बाहेर पडल्याने प्राणीहानी टळली. शिवाय कारखाना सध्या बंद असल्याने अनेकजण घराला कुलूप लावून परगावी गेले होते. -------------------ंंअर्ध्या तासात आग आटोक्यातअग्निशामक दलाला ७ वाजून २० मिनिटांनी वर्दी आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. यासाठी पाच गाड्यांचा वापर करण्यात आला.